Health insurance: हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? आरोग्य विमा का आवश्यक असतो?
Health Insurance Marathi | Representational Purpose Only (Photo Credits: Pixabay)

आरोग्य विमा (Health insurance) म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance Information In Marathi ) आज परीवलीचा शब्द झाला आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात हेल्थ इन्शुरन्स चे महत्त्व (Importance of Health Insurance) लोकांना अधिक कळले. अद्यापही अनेक लोक हेल्थ इन्शुरन्सबाबत फारसे उत्सुक नसतात. त्यांना याबाबत माहिती नसते. हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मुद्दा असला तरीही तो असल्यास वैद्यकीय खर्चावेळी मोठी मदत होते. अनेक लोक आपल्याला काय होते. आपण कधीच आजारी पडत नाही, असे म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढत नाहीत. काहींना हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता अनाठाई वाटतो. परंतू, असे करणे म्हणजे आपण स्वत:ला अधिक आर्थिक जोखमीत टाकणे होय. म्हणूनच जाणून घ्या, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? (What is Health Insurance) तो का महत्त्वाचा असतो?

Health insurance योजना काय आहे?

हेल्थ इन्शुरन्स योजना म्हणजे साध्या शब्दात असे की, ज्या ग्राहकाने किंवा विमाधारकाने ज्या कंपनीचा विमा घेतला आहे त्याला आवश्यक वेळी कंपनीने कबूल केलेली रक्कम त्याच्या हप्त्याच्या मोबदल्यात आर्थिक सहाय्य म्हणून देते. विमाधारकाच्या वैद्यकीय खर्चावेळी विमा कंपनी कव्हरेज देते. हेलथ इन्शुरन्स योजनेच्या माध्यमातून विमाधारकाला कॅशलेश चिकित्सा अथवा झालेल्या खर्चाचा परतावा मिळतो. (हेही वाचा, Health Insurance महागण्याची शक्यता, प्रीमियममध्ये सुद्धा झाली वाढ)

हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व

वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ आणि त्याला होणारा खर्च हा कधीही सांगून येत नाही. आजची धावपळीची जीवनशैली पाहता वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ अवेळी येण्याच्या शक्यता अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विमा असणे कधीही चांगले असे वैद्यकीय आणि आर्थिक नियोजनाचे अभ्यासक सांगतात. आरोग्य विमा असेल तर कोणत्याही रुग्णालयात तुम्हाला उपचार घेता येऊ शकतात. आर्थिक विवंचना कमी होतात. एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच मिळते. (हेही वाचा, Financial Management: आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी करा हे तीन रामबाण उपाय! जे तुम्हाला अडचणीच्या काळात करतील मोलाची मदत)

करसवलतीत फायदा

मेडिकल कव्हरेज सोबतच हेल्थ इन्शुरन्स योजना विमाधारकास आयकर कायदा (Income Tax Act) 1961 कलम 80 (ड) अन्वये करसवलतही देते. त्यामुळे आर्थिक सुरक्षा कवचासोबतच करसवलतीचाही फायदा मिळतो. म्हणजे विमा खरेदी केल्यास विमाधारकाला दुहेरी फायदा होतो.