Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी(Barabanki) येथे एकाने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर 10 लाख रुपयांचा विमा हडपण्यासाठी मोठ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा प्लान उघड झाला आणि त्याला शनिवारी अटक करण्यात आली. 5 जुलै रोजी स्वच्छता कर्मचारी अरविंद कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात अरविंदवर त्याचा लहान भाऊ वीरेंद्र याने गोळी झाडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, वीरेंद्रचे अरविंदच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती आणि अरविंदला त्याच्या पत्नीमार्फत विम्याच्या पैशाचा दावा करण्यासाठी हत्या केली. बाराबंकीचे पोलिस अधीक्षक दिनेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, 5 जुलैच्या रात्री बडोसराय पोलिस स्टेशन हद्दीतील मुराई मजरे मधनापूर गावातील रहिवासी अरविंद कुमार (35) यांची त्यांच्या घरी झोपेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या तज्ज्ञांनी केलेल्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान, मृत अरविंद याला गोळी जवळून मारण्यात आली. वीरेंद्रचे लोकेशन त्याच ठिकाणी असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना गुन्ह्यात वापरलेले बंदुक सापडले असून आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.