Health Insurance (Photo Credits-Twitter)

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आरोग्य विम्याची (Health Insurance) गरज अधिक भासू लागत आहे. मात्र ग्राहकांना आधीपेक्षा आता अधिक प्रीमियम द्यावा लागत आहे. तसेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चिंतेसह आरोग्य विम्याच्या किंमतीत वाढ होईल अशी चिंता ग्राहकांना सतावू लागली आहे. यामागील मुख्य कारण असे की, गेल्या एका वर्षादरम्यान कोरोनामुळे विम्या कंपन्यांना मोठ्या संख्येने क्लेमचे पैसे भरावे लागत आहेत. तर कोरोनाच्या काळात आरोग्य विम्या संदर्भात लोक अधिक जागृत झाले असून पुढे सुद्धा यामध्ये सुधार होऊ शकतो. यामुळे आरोग्य विम्याच्या विक्रीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.(7th Pay Commission DA, DR Benefits: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA, DR चा कितपत मिळणार लाभ? जाणून घ्या)

पॉलिसी बाजारच्या एका अभ्यासानुसार एप्रिल 2020 मध्ये कंपन्यांकडून करण्यात आलेला दावा हा देयाच्या चार टक्केच कोविड19 संबंधित होता. जो आता 40 टक्क्यांवर पोहचला आहे. कंपन्यांकडून याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही आहे. पण विमा क्षेत्रातील नियामक एजेंसी इरडाला या पद्धतीची सुचना मिळाली आहे. त्यानुसार काही विमा कंपन्यांकडूनआरोग्य विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ केली गेली होती.(LIC कर्मचार्‍यांसाठी खूषखबर; 16% पगारवाढ, 5 दिवसांचा आठवडा ते 13,500 रूपयांपर्यंत Additional Allowance मिळणार)

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे चीफ अंडरराइटग संजय दत्ता यांच्यानुसार कोरोनामुळे बहुतांश व्यवसायात बदल झाले आहेत. हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर याचा काय परिणाम होणार हे भविष्यातच कळू शकते. सध्या अनिश्चिततेच्या कारणामुळे याबद्दल बोलणे थोडे मुश्किल आहे. तसेच बजाज अलियांज जनरल इंन्शुरन्सचे हेड गुरदीप सह बत्रा यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या दरम्यान विमा कंपन्यांना अधिक क्लेम द्यावा लागत आहे.