7th Pay Commission DA, DR Benefits: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA, DR चा कितपत मिळणार लाभ? जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

केंद्र सरकार महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत भत्ता (Dearness Relief ) 1 जुलै पासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेशनधारकांना पूर्ण देणार असल्याची घोषणाा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केली होती. मात्र या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या DA दरापेक्षा 11 टक्के अधिक दर मिळणार आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसच्या संकटकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे डीए फ्रिज करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांनी डीएची रक्कम मिळत आहे. सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के अधिक 11 टक्के असा एकूण 28 टक्के डीए मिळण्याची शक्यता आहे.

All India Consumer Price Index (AICPI) यांनी दिलेल्या डेटानुसार, जानेवारी 2020 ते जून 2020 दरम्यान डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यानंतर जुलै 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान 4 टक्क्यांनी अधिक वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 ते जून 2021 दरम्यान अजून 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपासून ते या वर्षीपर्यंत 11 टक्क्यांनी डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (7th Pay Commission: मोदी सरकारने New Wage Code ची अंमलबजावणी केल्यास 1 एप्रिल 2021 पासून लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ!)

डीएमध्ये केलेल्या वाढीचा परिणाम डीआर मध्ये देखील दिसून येतो. त्यामुळे केंद्रीय पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती राज्यसभेला लेखी स्वरुपात दिली आहे. ठाकूर म्हणाले होते की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या तीन थकीत डीए हप्ते 1 जुलै 2021 पासून देण्यात येतील. तसंच मागील वर्षी वाढ झालेली डीएची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल.