Life Certificate Submission Deadline:  पेंशनधारकांना आता लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
Money | (Photo Credits: PTI)

आपल्या लाखो पूर्व कर्मचार्‍यांसाठी आता केंद्र सरकारने (Central Government) निर्णय घेतला आहे. आता मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh)  यांनी दिलेल्या माहितीनुसार आता केंद्र सरकारच्या पेंशनधारकांना आपलं जीवन प्रमाण पत्र (Life Certificate) सादर करण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान कोविड 19 मधील कठीण स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हे सर्टिफिकेट 30 नोव्हेंबर पर्यंत देण्याची मुदत होती. पेंशन मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकतात. अशी माहिती दिली आहे. या वाढवलेल्या वेळेमध्ये पीडीए द्वारा कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकते. आता याद्वारा बॅंक मधील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. तरीही बॅंकेमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हियर सांभाळलं जाईल याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आले आहे.  नक्की वाचा: Digital Life Certificate: SBI Pensioners ला यंदा व्हिडिओ कॉल द्वारा लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा .

मागील आठवड्यामध्ये पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने नवी Face Recognition Technology लॉन्च केली आहे. जिंतेंद्र सिंग यांच्या माहितीनुसार, या नव्या प्रणाली मुळे लाईफ सर्टिफिकेट्स देणं सुकर होणार आहे. याचा फायदा 68 लाख केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांसोबतच राज्य सरकारच्या कोट्यावधी इतर निवृत्तीवेतन धारकांना देखील होणार आहे.

सोमवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार,  45,78 लाख पैकी 18.16 लाख कोटी लाभार्थ्यांनी PM-SYM  पेंशन स्कीम मध्ये रजिस्टर केले आहे. PM-SYM पेंशन स्कीम ही केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या Director General (Labour Welfare)कडून राबवण्यात आली आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठीनंतर किमान महिन्याला 3 हजार रूपये पेन्शन दिली जाते.  सध्या 18-40 वयोगटातील आणि 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या असंघटित क्षेत्रातील मजूर या स्कीमसाठी पात्र आहेत.