नोव्हेंबर महिना सुरू झाला की पेन्शनधारक आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांची लाईफ सर्टिफिकेट देण्याची धावपळ सुरू होते. साठीच्या पार असलेल्या अनेकांना यासाठी बॅंकेमध्ये चकरा माराव्या लागतात. आता हाच त्रास कमी करण्यासाठी एसबीआय कडून यंदा ‘Video Life Certificate’चा पर्याय खुला करण्यात आला आहे. एसबीआय च्या या नव्या सुविधेला आज 1 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. ही सुविधा आता एका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एसबीआय मध्ये लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) सादर करावं लागणार्यांसाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे. सगळ्यात फायद्याचं म्हणजे यामुळे बॅंकेमध्ये जाण्यापासूनही वेळ वाचणार आहे.
एसबीआय कडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. एक व्हीडिओ ट्वीट करत त्यांनी प्रक्रिया देखील सविस्तरपणे सांगितली आहे. सरकारी पेन्शनरला वार्षिक लाईफ सर्टिफिकेट दर वर्षाला नोव्हेंबर महिन्यात सादर करावं लागतं. (नक्की वाचा: SBI चा ग्राहकांना खोट्या Customer Care क्रमांकापासून सावध राहण्याचा इशारा).
SBI Tweet
Now submit your #LifeCertificate from the comfort of your home! Our #VideoLifeCertificate service launching on 𝟏𝐬𝐭 𝐍𝐨𝐯 𝟐𝟎𝟐𝟏 will allow pensioners to submit their life certificates through a simple video call.#SBI #Pensioner #AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav pic.twitter.com/SsyJjnCPlL
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 29, 2021
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कसं सादर कराल लाईफ सर्टिफिकेट
- SBI ची Pension Seva website www.pensionseva.sbi ला भेट द्या.
- त्यानंतर ‘Video LC’ वर क्लिक करून Video Life Certificate ची प्रक्रिया सुरू करा.
- तुमचा SBI Pension Account Number एंटर करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर ओटीपी येईल.
- सार्या अटी आणि शर्थी नीट वाचा आणि नंतर ‘Start Journey’या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचं पॅन कार्ड तयार ठेवा आणि ‘I am ready’चा पर्याय निवडा.
- तुम्ही व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर जेव्हा SBI Official उपलब्ध असेल तेव्हा तुमचा व्हिडिओ कॉल सुरू होईल.
- तुमच्या सोयीनुसारही video call शेड्युल करू शकता.
- एकदा व्हिडीओ कॉल सुरू झाला की एसबीआय अधिकारी तुम्हांला 4 डिजिटचा व्हेरिफिकेशन कोड विचारतील जो तुमच्या स्क्रिनवर डिस्प्ले होईल.
- तुम्हांला पॅन कार्ड एसबीआय अधिकार्याला दाखवावे लागेल. त्यानंतर ऑफिशिअल तुमचा फोटो घेतील. यानंतर Video Life Certificate (VLC) ची प्रक्रिया पूर्ण होईल.
VLC Process जर पूर्ण झाली नाही तर तुम्हांला तसा मेसेज एसएमएस द्वारा दिला जाईल. किंवा तुमच्या नजिकच्या एसबीआय ब्रांचमध्ये जा आणि तेथे लाईफ सर्टिफिकेट सादर करा. लाईफ सर्टीफिकेट सादर करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून 30 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया सुरू होणार आहे.