World Breast Feeding Week: आईच्या दुधाची किंंमत ही किती आहे हे काही वेगळ्याने सांगायला नको, एक सुदृढ बाळ हे नियमित केलेल्या स्तनपानाचा रिझल्ट असते. त्यामुळे बाळ जन्मल्यानंतर निदान सुरुवातीचे सहा ते नऊ महिने मातेने स्तनपान आवश्य करण्याचा सल्ला दिला जातो. या स्तनपानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा साजरा केला जातो. यंदा या आठवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार, महिला आणि बाल विकास मंत्रालय (Maharashtra Government) तर्फे मातांना खास मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना संंकट (Coronavirus Pandemic) काळात अनेक माता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत किंंवा लागण झाली आहे त्या स्तनपान करणे टाळतात मात्र असं करण्याची गरज नाही, थोडी काळजी घेतल्यास बाळासाठी अमृतासमान मानले जाणारे स्तनपान आपण सुरक्षित रित्या करु शकाल, आता यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे थोडक्यात जाणुन घेउयात.
कोरोनाची लक्षणे असल्यास स्तनपान करताना काय काळजी घ्यावी?
-मास्क घालणे कधीही विसरु नका.
-बाळाला हात लावण्याआधी स्वच्छ हात धुवा.
-बाळाच्या आजुबाजुला असणार्या वस्तु वारंंवार सॅनिटाईझ करा.
-शक्य तितक्या लवकर वैद्यकीय चाचणी करुन घ्यावी.
-एक लक्षात घ्या, स्वतः मास्क घाला मात्र दोन वर्षांंच्या खालील बाळाला मास्क लावु नका,त्यामुळे श्वसनास त्रास होईल.
कोरोनाची लागण झाली असल्यास स्तनपान करावे का?
-हो, आईला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले असले तरी स्तनपान करणे टाळू नये.
-कोरोनाच्या धोक्यापेक्षा स्तनपानाचे फायदे अधिक असल्याचे सांगितले जाते.
-गंंभीर परिस्थिती असल्यास, हाताने वाटीत दुध काढुन कुटुंबातील अन्य सदस्याकडुन बाळाला पाजायला द्यावे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय ट्विट
जागतिक आरोग्य संघटना सर्वांना सल्ला देते की,
आपण स्तनपान करणा-या महिलांना पाठींबा द्यायला हवा#breastfeedingweek #स्तनपान_अमृत_समान #breastfeeding pic.twitter.com/lXX7RtRwst
— Maha_DWCD (@MDwcd) August 6, 2020
हेही वाचा- स्तनपान करणा-या महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम
एक लक्षात घ्या, कोरोनाच्या काळात स्तनपान टाळणे हे बाळाच्या हिताचे नाही, स्तनपानामार्फत कोरोना पसरत सुद्धा नाही, त्यामुळे वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा मात्र स्तनपान करणे टाळू नका.