मुलं म्हणजे मातीचा गोळा. घडवावा तसा घडणार. त्यामुळे सहाजिकच आजूबाचूचे वातावरण, सवयी, नियमीतपणे पाहण्यात येणाऱ्या गोष्टी या सर्वांचा मोठाच परिणाम मुलांच्या जडणघडणवीर होतो. अलिकडे तर बलदल्या जीवनशैलीनुसार मुलं मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर अधिक मोठ्या प्रमाणावर करतात. दिवसातील अधिकाधिक वेळ हा या उपकरणांच्या सानिध्यात घातवातात. याला 'स्क्रीन टाईम' (Screen Time) असे म्हणतात. तुमच्या मुलांचाही 'स्क्रीन टाईम' (Screen Time Affects on Children) अधिक असेल तर तुम्हाला सवाध होण्याची आवश्यकता आहे. जाणून घ्या 'स्क्रीन टाईम' तुमच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, इमोशनल, व्यावहार आणि ज्ञान यांबाबतच्या विकासावर (Cognitive Development) काय परिणाम करतो.
जी मुलं 'स्क्रीन टाईम' (Screen Time) अधिक खर्चकरतात त्या मुलांची हालचाल बरीच कमी होते. त्यांच्या वर्चुअल वर्ल्ड अधिक विस्तारले जाते. ज्यामुळे त्यांच्या बोलण्यावर, वर्तनावर आणि सामाजिक ज्ञानावर, सवयींवर मोठा परीणाम होतो. 'स्क्रीन टाईम' खर्च करणारी मुलं ही शक्यतो अबोल, स्वत:च्या विश्वात रममान असणारी असतात. ती अभासी बोलताना आढळतात. जसे की, कल्पनेत रमने, कल्पनेतील मित्र, कल्पनेतील शत्रू मानून त्यांच्याशी बोलणे भांडणे, एकटेच बोलणे असे प्रकार करताना ही मुले आढळतात. या सर्वांचा मुलांच्या सर्वांगिण विकासावर मोठा परीणाम होतो. (हेही वाचा, Lockdown: मुलांना शाळेत पाठविण्याबाबत देशभरातील पालक काय विचार करतात? घ्या जाणून)
अनेकदा मुलांच्या भाषेवरही मोठा परीणाम होतो. जसे की ही मुले व्हर्च्युअली आणि स्क्रिन टाईम मध्ये जे काही पाहतात त्याचा त्यांच्या भाषेवरही मोठा परीणाम होतो. प्रामुख्याने या मुलांची भाषा बदलते. मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनीक वस्तुंच्या माध्यमातून ती जी काही पाहतात त्यानुसार ती बोलायला शिकतात. अनेकदा वेगवेगळ्या भाषेत बोलतात. वेगवेगळ्या संकल्पनांसाठी वेगवेगळे शब्द वापरताता. त्यांचा चेहरा, हावभाव, हात्वारे बदलतात. त्यांची अभ्यासातील आवडही बरीच कमी होताना दिसते. (हेही वाचा, Digital Education: ऑनलाईन शिक्षणासाठी 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन व लॅपटॉपच नाहीत; 28 टक्के विद्यार्थ्यांकडे विजेची कमतरता- NCERT Survey)
अशा मुलांच्या झोपेवरही मोठा परीणाम होतो. खास करुन स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या किरणांचा (ब्लू लाईट) मुलांवर परीणाम होतो. त्यामुळे त्यांना झोप येत नाही. सुरुवातीला कमी असलेली ही समस्या हळूहळू कॉग्निटिव डेवलपमेंटमध्ये बदलते. अनेक लहान मुलांमध्ये ही समस्या आढळते.