Lockdown: मुलांना शाळेत पाठविण्याबाबत देशभरातील पालक काय विचार करतात? घ्या जाणून
Education | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) येत्या काळात पूर्णपणे हटवला जाईल. लॉकडाऊन हटवला तरी परीस्थिती पूर्व पदावर येण्यासाठी बराच काळ लागेल. इतकेच नव्हे तर त्याचे परिणामही दूरगामी असतील. एडटेक स्टार्टअप एसपी रोबोटिक वर्क्स द्वारा करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून असाच एक धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. देशभरातील जवळपास 78 % पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासंबंधी बेफीकीर आहेत. त्यांना आपल्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, जीवनशैली आणि इतर गोष्टींची पर्वा नाही.

एडटेक स्टार्टअप एसपी रोबोटिक वर्क्सने देशभरातील मुंबई, हैदराबद, दिल्ली यांसह अनेक मेट्रोपॉलिटन शहर आणि इतरही काही छोठ्या मोठ्या शहरांतून सर्वे केला. त्यासाठी 3600 पालक आणि जवळपास तितकेच विद्यार्थी आदींना विविध प्रश्न विचारण्यात आले.

सर्व्हेमध्ये आढळून आले की, अनेक शहरांतील पालक हे लॉकडाऊन संपुष्टात आणला तरीही ते आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित नाहीत. इतकेच नव्हे तर जवळपास 50 % मुलांच्या झोपण्याच्या वेळा (सीप पॅटर्न) बदलला आहे. केवळ 13 % मुलांचाच स्लीप पॅटर्न योग्य पद्धतीने नियमीत आहे. (हेही वाचा, Digital Education: ऑनलाईन शिक्षणासाठी 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन व लॅपटॉपच नाहीत; 28 टक्के विद्यार्थ्यांकडे विजेची कमतरता- NCERT Survey)

जवळपास 67 % पालकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या मुलांचे मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहण्याच्या सवयीत वाढ झाली आहे. स्क्रीन टाईम वाढला आहे. इतकेच नव्हे तर, 40 % मुलं ही चिंताग्रस्त (Anxiety issues) आढळली आहेत. सर्वेनुसार 7 ते 10 वर्षांच्या वयोगटातील 10 % मुले आंतेप्योनॉर बनू इच्छितात. तर 16 ते 17 या वयोगटातील हेच प्रमाण 17% पर्यंत पोहोचते.