Plasma Therapy: कोरोना मुक्त झाल्यावर किती दिवसांनी करता येणार प्लाझ्मा दान, जाणून घ्या
Plasma Therapy For COVID-19 (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची आकडे वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (Project Platina) या प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) उपक्रमाचे उदघाटन केले आहे.प्रोजेक्ट प्लॅटिना हा प्लाझ्मा थेरपीचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तर दिल्ली मध्ये सुद्धा प्लाझ्मा प्रयोग सुरु आहेत. कोरोना व्हायरस रुग्णांसाठी हा प्रकल्प काम करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी यापूर्वीच कोरोना व्हायरस (Coronavirus) मधून मुक्त झालेल्या मंडळींना पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करण्यासाठी यावे असे आवाहन केले आहे. मात्र कोरोना मुक्त झाल्यावर नेमक्या किती दिवसांनी हे डोनेशन तुम्हाला करता येउ शकते व याची प्रक्रिया काय याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती

लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज च्या शिक्षिका डॉ. अपर्णा अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,प्लाझ्मा थेरपी साठी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा वापर केला जातो. या अँटीबॉडी रुग्णांच्या प्लाझ्मा मध्ये म्हणजेच रक्तातील घटकात असतात. या अँटीबॉडीज प्लाझ्मा च्या माध्यमातून गंभीर अवस्था असणाऱ्या रुग्णांच्या शरीरात इन्सर्ट केल्या जातात. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोरोनमुक्त होऊनही रुग्णाने निदान 28 दिवस थांबणे आवश्यक आहे. 28 दिवसात विषाणूचे कोणतेही लक्षण शरीरात न आढळल्यास प्लाझ्मा डोनेशन करणे सुरक्षित ठरेल. डॉ. अपर्णा पुढे म्हणतात की, ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असताना लक्षणे स्पष्ट होती त्यांच्या प्लाझ्मा डोनेशनने अधिक फायदा होतो, कारण त्यांच्यात अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक असते.

दरम्यान, प्लाझ्मा डोनेशन ची संपूर्ण प्रक्रिया ही रक्तदानाच्या सारखीच आहे, त्यात घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. यासाठी तुम्ही कोविद केअर केंद्रात संपर्क साधू शकता, किंवा सरकारी रुग्णालयात याबाबत विचारणा करता येईल.