Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेमध्ये (USA) डुक्कराची किडनी (Pig Kidney)  मानवी शरीरामध्ये (Human Body) ट्रान्सप्लांट करण्याच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मागील दशकापासून सुरू असलेल्या या प्रयत्नाला अखेर लहानसं यश मिळालं आहे. मानवी शरीरात ट्रांसप्लांट करण्यात आलेले मूत्रपिंड  सुरु देखील झाले आहे. दरम्यान अवयवांची कमतरता दूर करण्यासाठी डुक्कर हे सध्या संशोधनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पण यामध्ये अनेक अडथळे देखील होते. प्रामुख्यान डुक्करांच्या पेशींमध्ये असणारी साखर, मानवी शरीरासाठी ते फॉरेन बॉडी असणं यामुळे अनेकदा अवयव नाकारला जात असे. नक्की वाचा: पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती.

न्युयॉर्क सिटी मध्ये एनवाईयू लैंगन हेल्थ मध्ये एका डुक्कराचं परीक्षण करण्यात आलं त्याच्या जीन मध्ये बदल करण्यात आले त्याच्यामुळे ते मानवी शरीराशी जुळवून घेण्यात यशस्वी झालं. त्यानंतर डुक्कराची किडनी एका ब्रेन डेड रूग्णाच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आली. या ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरातील किडनी पूर्णपणे निकामी झाली होती. त्याच्या कुटुंबियांनी लाईफ सपोर्ट सिस्टम वरून हटवण्यापूर्वी परीक्षणाची परवानगी दिली होती. नक्की वाचा:  दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज.

सर्जन कडून डुक्कराची किडनी ही मानवी शरीरात मोठ्या रक्तवाहिन्यांना जोडण्यात आले. त्यानंतर दोन दिवस त्याचं निरिक्षण करण्यात आले. यामध्ये किडनीकडून जे कामं करणं अपेक्षित होतं ते पुन्हा सुरू झाल्याचं पहायला मिळालं. यामध्ये शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यात आलं, युरिन निर्माण करण्यात आलं. तसेच रिजेक्शन देखील टाळण्यात आलं. माकडापेक्षा डुक्कराकडे अधिक फायदे असल्याचेही निदर्शनास आलं आहे. डुक्करांमध्ये मानवी शरीराच्या तुलनेत लहान गर्भधारणा कालावधी आणि अवयव असतात.

दरम्यान प्राणी ते मानवी शरीर या प्रत्यारोपणाचे स्वप्न म्हणजेच xenotransplantation हे 17 व्या शतकात परत जाण्यासाठी प्राण्यांचे रक्त रक्तसंक्रमणासाठी वापरण्याच्या प्रयत्नामध्ये होते. 20व्या शतकापर्यंत सर्जन बेबून मधून मानवामध्ये अवयवांचे प्रत्यारोपण करण्याचे प्रयत्न केले जातात. विशेषत: बेबी फे, एक मरण पावलेले अर्भक, जे बबून हृदयासह 21 दिवस जगले होते. सध्या अनेक बायोटेक कंपन्या प्रत्यारोपणासाठी योग्य डुकराचे अवयव विकसित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.