
बदलत्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याचा पद्धतीत सुद्धा बदल झाला आहे. तर काही जणांना जेवल्यानंतर लगेच झोप येणे, थोड्यावेळाने पुन्हा भुक लागल्याने खाणे अशा विविध सवयी असतात. मात्र या सवयी तुमच्या आरोग्याला धोका पोहचवू शकतात. हे खरं आहे कारण जेवल्यानंतर काही गोष्टी खाऊ नये किंवा करु नयेत असा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर खाणे किंवा झोपण्याची सवय असल्यास ती आजच बदला. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.
सकाळचा नाश्ता पोटभरून करायचा, दुपारचे जेवण मध्यम आणि रात्रीचे जेवण अगदी कमी करावे असे सांगितले जाते. कारण दिवसभरातील आपण ज्या गोष्टी खातो त्या पचण्यास काही काळ लागत असून ते नीट न पचल्यास विविध समस्या उद्भवतात. मात्र जर तुम्हाला जेवणानंतर काही गोष्टी करण्याची सवय असल्यास तर आधीच सावध व्हा. नाहीतर आरोग्यास नुकसान होईल.
-जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय टाळा. कारण यामुळे जेवलेले अन्न पचण्यासाठी समस्या येते. जेवणाच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर चहा किंवा कॉफी न पिण्याचा डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. या सवयीमुळे तुम्हाला अॅनिमिया होण्याची शक्यता असते.
-फळ उपाशी पोटी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते . मात्र सकाळचा पोटभर नाश्ता केल्यानंतर फळ खाणे टाळा. कारण नाश्तानंतर फळ खाल्यास ते पचण्यास समस्या येईल. फळांचे सेवन तुम्ही संध्याकाळी केल्यास तरीही त्याचा धोका उद्भवत नाही.
-पचनासाठी पाणी हा उत्तम उपाय आहे. परंतु जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नका. खासकरुन थंड पाणी पिणे टाळा. त्यामुळे पाचनक्रिया धिम्या गतीने होऊन तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.(Health Tips: सकाळी चहा पिण्याऐवजी प्या जि-याचे पाणी होतील हे आरोग्यदायी फायदे)
त्यामुळे वरील गोष्टी जेवल्यानंतर करु नका. तसेच सिगरेट पिणे, दारु पिणे या सवयी सुद्धा जेवल्यानंतर केल्यास आरोग्यास धोकादायक ठरु शकतात. तर काही जण जेवण झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी अंघोळ करतता. पण ही सवय वाईट असून त्याचा शरिरातील रक्तपुरवठा सुरळीत सुरु राहण्यास अडथळा निर्माण करतो.