Surgery | (Photo credit: archived, edited, representative image)

मिशिगन (Michigan) येथील 30 वर्षीय डेरेक फाफ (Derek Pfaff) हा व्यक्ती जगभरातील दुर्मिळ चेहरा प्रत्यारोपण (Face Transplant) यशस्वी झालेल्या दुर्मिळ लोकांपैकी एक ठरला आहे. त्याच्यावर या वर्षाच्या सुरुवातीस करण्यात आलेली महत्वाची आणि तितकीच दुर्मिळ शस्त्रक्रिया (Rare Surgery) यशस्वी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही शस्त्रक्रिया तब्बल 50 तासांहून अधिक काळ चालली. इतकेच नव्हे तर ती करण्यासाठी डॉक्टर, तज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचारी मिळून 80 हून अधिक लोक सक्रीय होते. या शस्त्रक्रियेचा परिणाम (Medical Miracle) दिसायलाही बराच वेळ जातो. अखेर या शस्त्रक्रियेचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. डेरेक फाफ याने आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Survival) केला होता. ज्यामुळे त्याचा चेहरा विद्रुप झाला होता. त्यावर शस्त्रक्रियेद्वारे मार्ग काढण्यात आला.

एक दशकाच्या संघर्षानंतर आयुष्याला कलाटणी

डेरेक फाफ याचा संघर्षाचा प्रवास सन 2014 पासून सुरु झाला. जेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामध्ये तो अयशस्वी ठरल्याने त्याचा जीव वाचला पण शरीराला गंभीर दुखापत झाली. चेहऱ्यावरही असंख्य जखमा झाल्या. ज्यामुळे त्याचा चेहार विद्रुप झाला होता. आपला चेहरा बदलण्यासाठी तो प्रचंड प्रयत्न करत होता. पाठिमागील 10 वर्षांत, त्याने जवळपास 58 पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्या, परंतु त्याला नाकाच्या अभावामुळे अडथळा येत होता. त्याला अन्न खाता येत नव्हते. शिवाय तो सामान्यपणे संवादही साधू शकत नव्हता. त्याला चष्माही घालता येत नव्हता. मात्र, त्याच्यावर पापण्या, जबडे, दात, नाक, गाल आणि मानेच्या त्वचेसह चेहऱ्याच्या 85% भागावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. ज्याचे सकारात्मक परिणाम आल्याने तो सामान्य जीवन जगू शकतो ही खात्री पटली. अशा प्रकारची शस्ज्ञक्रिया प्रचंड गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक असते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या दुर्मिळ लोकांमध्ये डेरेक फाफ याचा समावेश झाला आहे. (हेही वाचा, Mumbai News: मुंबईत 99 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया, जसलोक रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया)

माझे आयुष्य बदलले: फाफ

रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या मेयो क्लिनिकने (Mayo Clinic) शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये फाफ सांगताना दिसतो की, "या शस्त्रक्रियेने माझे आयुष्य बदलले आहे. मला खूप जास्त आत्मविश्वास वाटतो. मी एका कारणासाठी जगलो. मला इतरांना मदत करायची आहे. मला ही दुसरी संधी दिल्याबद्दल मी माझा दाता, त्याचे कुटुंब आणि माझ्या काळजी घेणाऱ्या चमूचा खूप आभारी आहे ". (हेही वाचा, Parrot Undergoes Tumour Surgery: ऐकावे ते नवलंच! मध्य प्रदेशमध्ये झाली 21 वर्षीय पोपटावर शस्त्रक्रिया; 2 तास ऑपरेशन करून काढली 20 ग्रॅमची गाठ)

एक दुर्मिळ वैद्यकीय कामगिरी

चेहरा प्रत्यारोपण ही जागतिक स्तरावर दुर्मिळ वैद्यकीय प्रक्रियांपैकी एक आहे. जी गेल्या 20 वर्षांत केवळ 50 पेक्षा जास्त वेळा केली गेली आहे. फाफ यांची शस्त्रक्रिया एक उल्लेखनीय यश म्हणून ओळखले जात आहे. जी पुनर्रचनात्मक औषधांमधील प्रगती दर्शवते.

वयवर्षे 19 असताना फाफ यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या 5 मार्च 2014 रोजी सुट्टीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बंदुकीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या फाफ त्याच्या वडिलांच्या दृष्टीस पडला. धक्कादायक म्हणजे रक्त गोठवणाऱ्या थंडीत तो बर्फावर असहाय अवस्थेत पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची अवस्था पहात तो जीवंत राहिल याची शक्यता कमीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणने होते. मात्र, त्याच्यावर उपचार सुरु केले आणि तो प्रतिसाद देऊ लागला. अकेर तो मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला आणि आता तर त्याचा चेहराही बदलला गेला.