Parrot Undergoes Tumour Surgery: मध्य प्रदेशातील सतना येथे डॉक्टरांनी एक मोठा चमत्कार केला आहे. या ठिकाणी  बेतू असे नाव असलेल्या 21 वर्षांच्या पोपटावर ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या टीमने मिळून पोपटाच्या मानेतील 20 ग्रॅमची गाठ काढून त्याला नवजीवन दिले. ही गाठ काढण्यासाठी डॉक्टरांच्या टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र दोन तास चाललेल्या ऑपरेशननंतर अखेर पोपटाच्या मानेतून ही गाठ काढण्यात आली. सुमारे 6 महिन्यांपूर्वी पोपट मालकाच्या पोपटाच्या मानेवर एक गाठ दिसली होती. ती हळूहळू वाढत होती आणि त्यामुळे पोपटाला खूप त्रास होत होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते आणि जेवायलाही येत नव्हते.

यानंतर मालक चंद्रभान विश्वकर्मा यांनी पोपटावर उपचारासाठी जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय, सतना येथील डॉक्टरांशी संपर्क साधला. या पोपटाचे वय 21 वर्षे असल्याचे मालकाने सांगितले आहे. पोपटाची तपासणी केल्यानंतर पशुवैद्यकांनी त्याला गाठ असल्याचे निदान करून ऑपरेशनचा सल्ला दिला. यानंतर पशुवैद्यकांनी पोपटावर सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करून रविवारी 15 सप्टेंबर रोजी 20 ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली. सध्या हा पोपट पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहे. जिल्ह्यातील एखाद्या पक्ष्याला गाठ होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पशुवैद्य डॉ. बालेंद्र सिंह म्हणाले. (हेही वाचा: Viral Video: पांढऱ्या सिंहाला मिठी मारून त्यावर महिलेने केला प्रेमाचा वर्षाव, व्हिडीओ पाहून बसेल धक्का)

मध्य प्रदेशमध्ये झाली 21 वर्षीय पोपटावर शस्त्रक्रिया-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)