पवई येथील रहिवासी आणि व्यवसायाने संशोधन शास्त्रज्ञ असलेल्या 37 वर्षीय रिचा कौशिक अरोरा यांच्यावर दोन कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर अली आहे. या हल्ला इतका गंभीर होता की, त्यानंतर त्यांच्या नाकाची शस्त्रक्रिया करावी लागली. या घटनेनंतर, पवई पोलिसांनी रविवारी कुत्र्याचा मालक दिव्येश विर्क, त्याचा ड्रायव्हर आणि त्याच्या घरकाम करणाऱ्या नोकरावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी अरोरा या जल वायु विहारमधील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी दुसऱ्या इमारतीकडे जात असताना, एका पिट बुल आणि एका डॉबरमनने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर हल्ला केला, त्यानंतर त्यांना तातडीने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर 20 टाके घालावे लागले. यावेळी कुत्र्याचे मालक विर्क दाम्पत्य परदेशात होते आणि त्यांनी त्यांचा ड्रायव्हर अतुल सावंत आणि घरकाम करणारी स्वाती यांच्यावर कुत्र्यांची जबाबदारी दिली होती. (हेही वाचा: World's Most Expensive Dog 'WolfDog': बेंगळुरू येथील व्यक्तीने खरेदी केला लांडगा आणि कुत्र्याचे मिश्रण असलेला 'वुल्फडॉग' प्राणी; किंमत 50 कोटी)

Dog Attack In Powai:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)