Mumbai Local Train Delayed: मुसळधार पावसामुळे लोकलचा वेग मंदावला; उपनगरीय गाड्या 8-10 मिनिटे उशिराने धावणार

Mumbai Local Train Delayed: मुसळधार पावसामुळे लोकलचा वेग मंदावला; उपनगरीय गाड्या 8-10 मिनिटे उशिराने धावणार
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Local Train Delayed: सततच्या पावसाने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला. उपनगरीय गाड्या सुमारे 8-10 मिनिटे उशिराने धावत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईतील अनेक उपनगरीय भागात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसानंतर सोमवारी पहाटेही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. आयएमडीने वर्तवल्यानुसार सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस राहील. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain: मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन; बोरिवली, सांताक्रूझ, पवई, मुलुंड, चेंबूर, वरळी, कुलाबा आणि अलिबागला रेड अलर्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2025 08:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).