Hair Transplant Turns Fatal in Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये केस प्रत्यारोपणाच्या (Hair Transplant) प्रक्रियेत विनीत दुबे नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या पंकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून तैनात असलेल्या दुबे यांची प्रक्रिया केल्यानंतर दिसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. चुकीच्या शस्त्रक्रियेनंतर(Botched Surgery) त्याचा चेहरा सुजला होता. त्याची तब्येतही बिघडली होती. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुबे यांच्या अचानक मृत्यूनंतर केस प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरनेही क्लिनिक बंद करून डॉक्टरने पळून काढल्य़ाचे समोर आले आहे. मृताच्या पत्नीने क्लिनिक आणि त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंबंधीत आता चौकशी सुरू आहे.

केस प्रत्यारोपणच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)