मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर (Measles Outbreak In Mumbai) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत सोमवारी 78 नव्या गोवर (Measles Disease) रुग्णांची भर पडली. गोवर हा आजार संसर्गजन्य आहे आणि तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. हा अजार श्वसन प्रक्रियेत संसर्ग निर्माण करतो. त्यानंतर त्याचा प्रादुर्भाव रुग्णाच्या संपूर्ण शरीरात पसरतो. ज्यामुळे रुग्णाला सर्दी, ताप, थंडी, अंगावर लहान पुरळ आणि श्वसनविकार आदी लक्षणे (Symptoms of Measles) दिसतात. हा आजार पूर्णपणे बरा करता येतो. योग्य लसीकरण आणि उपचारांद्वारे हा आजार बरा करता येऊ शकतो. इथे आम्ही गोवर रोखण्याचे काही सहा उपाय देतो आहोत. या सहा प्रकारांनी गोवर आजाराला आळा घालता येऊ शकतो.
गोवरची लक्षणे (Symptoms of Measles)
गोवर आजाराचा संसर्ग होण्यापू्वी काही चिन्हे आणि लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. सामान्यत: ही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपाययोजना सुरु करा. लक्षणे खालील प्रमाणे. (हेही वाचा, Measles Report: एका गोवरच्या रुग्णाकडून तब्बल 18 रुग्णांना होवू शकते लागण, WHO कडून विशेष सुचना जारी)
- गोवर विषाणूच्या संपर्कात आल्यास साधारण 10 ते 12 दिवसांनी उच्च ताप सुरु होतो.
- रुग्णाचा घसा खवखवतो, सातत्याने खोकला येतो.
- डोळ्यांच्या बुबळाचा पुढच्या भागात दाह होतो. खास करुन डोळे लाल आणि पाणचट होतात.
- चेहऱ्यावर किंवा मानेच्या भागात त्वचेवर पुरळ येतात. हे पुरळ नंतर अंगभर पसरतात.
गोवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची घबरदारी
गोवर हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे हा आजार एक तर हवेतून अथवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. खोकणे, शिंकणे, गोवर झालेल्या रुग्णशी आलेला घनिष्ठ संबंध आदींमुळे हा अजार अधिक पसरतो. या आजाराला रोखण्यासाठी काही उपाय खालील प्रमाणे आहेत. ज्यामुळे गोवर प्रादुर्भाव कमी होतो.
लसीकरण
लसीकरण करणे हा गोवर आजारावरील सर्वात उत्तम आणि योग्य मार्ग आहे. साधारण 12-15 महिने वयोगटातील मुलांना रुबेला (MMR) लस दिली जाते. ही लस गोवर-गालगुंड-रुबेला अशा आजारांवर एकत्रित असते. या लसीचा दुसरा डोस साधारण 4 ते 6 वर्षांच्या दरम्यान दिला जातो. ज्या प्रौढांना कधीही लसीकरण मिळालेले नाही ते देखील डोस मिळविण्यासाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
गर्दीची ठिकाणे टाळा
गोवरची साथ असताना शक्यतो लहान मुलांना घेऊन गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे कटाक्षाणे टाळा. जेणेकरुन मुलांना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.
गोवरच्या रुग्णाशी संपर्क कमी करा
गोवर हा आजार हवेतून आणि प्रामुख्याने गोवर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होतो. त्यामुळे या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाशी संपर्क टाळा.
लक्षणांकडे लक्ष द्या, दुर्लक्ष नको
ताप, सर्दी, खोकला, डोळ्यांमध्ये लालसरपणा अथवा अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. वर दिलेल्या गोवरच्या लक्षणांकेड दर्लक्ष करु नका.
स्वच्छता राखा
गोवर टाळण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. अस्वच्छ, गलीच्छ ठिकाणी जाणे टाळा. उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ पाणी, सार्वजनिक ठिकाणी पेय, खाणे टाळे. सातत्याने हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धूत चला.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या एका माहितीनुसार जगभरात 2000 ते 2018 या कालावधीत झालेल्या लसीकरणामुळे गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 73%ने कमी झाले आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी लसीकरण झाल्यास गोवरचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकरांनी आपल्या पाल्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे आवश्यकतेनुसार योग्य वयात लसीकरण करणेही अधिक महत्त्वाचे आहे.