राज्यभरात गोवरच्या रुग्णांची संख्या रोज वाढताना दिसत आहे. मुंबईसह आता राज्यातील इतर शहरांमध्ये सुध्दा गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून गोवर रुग्णांसंबंधी विशेष सुचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. एवढचं नाही तर अचानक गोवरने का तोंडवर काढलं यामागचं कारण देखील WHO कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोविड-19 महामारीच्या काळात गोवर लसीकरण कव्हरेजमध्ये सातत्याने घट झाली आहे. म्हणजेचं महामारि दरम्यान बालकांना गोवर लस देण्यात आली नाही. कारण सर्वत्र कोरोनामुळे भीतीचं वातावरण होत रुग्णालयात जावून लस घेणं हे धोक्याचं वाटत सल्याने काही बालकांचा गोवर लसीचा पहिला डोस चुकला तर काहींचा दुसरा. त्यामुळे फक्त भारतातचं नाही तर जगभरात पुन्हा एकदा गोवरची साथ येण्याची भिती जागतीक आरोग्य संघटनेकडून व्यक्त केली गेली आहे.
गोवर हा सर्वाधिक संसर्गजन्य आजारांपैका एक आहे. तसेच विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी यावर आजपर्यत जगभरात कुठलही औषध उपलब्ध नाही तरी लसीकरण हाचं एकमेव रामबाण उपाय असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. तरी योग्य वेळात लसीकरण न झाल्यानेचं गोवरचा उद्रेक झाल्याची माहिती जागतीक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. WHO ने जागतिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील आरोग्य विभागास तातडीने लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. (हे ही वाचा:- Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना जारी)
Nearly 4⃣0⃣ million children missed a measles vaccine dose in 2021.
🚨 According to the latest data from WHO & @CDCgov, global progress toward #measles elimination is threatened by major setbacks that started in 2020 during the #COVID19 pandemic.
👉 https://t.co/zw2Pv08c02 pic.twitter.com/ZSoulTYHuo
— World Health Organization (WHO) (@WHO) November 25, 2022
It’s not all bad: last year the #measles vaccines saved the lives of over 2⃣ million children 🧒🏻👧🏾
Measles elimination remains feasible if we focus on:
🔎 Strengthening surveillance
💉 High vaccination coverage
🚨 Timely outbreak response
👉 https://t.co/zw2PuZR8Y2 pic.twitter.com/wLURkdRCh9
— World Health Organization (WHO) (@WHO) November 25, 2022
मुंबईसह औरंगाबादेत रुग्ण आढळल्यानंतर आता संपूर्ण राज्यभरातचं गोवरचे संशयित रुग्ण आढळताना दिसत आहेत. गोवरच्या संसर्गामुळे सध्या पालकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अंगावर लाल पूरळ, ताप, लाल डोळे असी लक्षण आढळून आल्यास आपल्या पाल्यांना लवकरात लवकत रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच तुमच्या बालकांचे गोवर लसीकरण झाले आहे का नसेल झाल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याच्या सुचना देखील आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.