Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना जारी
Measles (Photo Credits: pxhere)

मुंबई (Mumbai) पाठोपाठ आता औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील गोवरने (Measles) तोंड वर काढलयं. दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह (Measles Report Positive) आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत. त्यापैकी चौदा बालकांची गोवर चाचणी केली असता दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. पण तरीही ८ बालकांचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही तरी रुग्णसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना दिल्या आहे तसेच भीती बाळगण्यापेक्षा योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात आले आहे. गोवरची लागण झालेल्या एका बालकाचं वय ७ वर्ष तर दुसऱ्याचं ११ वर्ष आहे. तरी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातचं अनेक संशयित रुग्ण आढळून येत आहे. अंगावर लाल पूरळ, ताप, लाल डोळे असी लक्षण आढळून आल्यास आपल्या पाल्यांना लवकरात लवकत रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

मुंबईत (Mumbai) रुग्णसंख्या दिवसेनदिवस वाढतचं आहे. प्रशासनाकडून योग्य काळजी घेण्यात येत असली तरी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबई प्रमाणेच औरंगाबाद (Aurangabad) आरोग्य विभाग (Health Department) देखील हाय अलर्टवर (High Alert) आहे. जिल्ह्यात गोवरच्या लसीकरणास (Vaccination) सुरुवात केली आहे. गोवर आजारावर कुठलाही औषधी उपचार नसल्याने केवळ लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय आहे. तरी तुम्ही तुमच्या पाल्यास गोवर लस न दिल्यास ती ताबडतोब द्यावी असे वाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. (हे ही वाचा:-)

 

मुंबई नंतर आता औरंगाबादमध्ये गोवरचे रुग्ण बघता राज्यभरात (Maharashtra) गोवरची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसेनदिवस रुग्ण संख्येत वाढ बघायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Mistry Of India) महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयास विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. तरी औरंगाबादकरांनी काळजी घ्यावी आणि आपल्या पाल्याचे तातडीने लसीकरण करावे.