Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Covid XBB 1.16 Symptoms: महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांचे (Corona Patients) प्रमाण वाढले आहे. या नवीन स्ट्रेन (New Strain) ची उत्पत्ती महाराष्ट्रातच झाल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात एका दिवसात 155 जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, तेलंगणामध्ये मंगळवार आणि बुधवारी 100 प्रकरणे आढळून आली. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सकारात्मकता दर 5% आणि 10% आहे.

COVID XBB 1.16 ची लक्षणे -

आतापर्यंत कोविडच्या या नवीन स्ट्रेनची लक्षणे पूर्वीसारखीच दिसत आहेत. या स्ट्रेनची कोणतीही नवीन लक्षणे आढळून आलेली नाहीत. डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि खोकला ही लक्षणं कोविड रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. याशिवाय अनेकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा - COVID 19 In India: देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र सह या 5 राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश)

कोव-स्पेक्ट्रमनुसार, भारतात कोरोनाव्हायरसचा XBB 1.16 स्ट्रेन पसरत आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये या स्ट्रेनचे प्रमाण वेगाने पसरत आहे. तज्ञांच्या मते सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांला XBB 1.16 स्ट्रेनची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. या विषाणूचे संक्रमण वेगाने पसरत आहे. XBB 1.16 हा Omicron प्रकाराचे उप-प्रकार आहे. 2021 च्या शेवटी, Omicron ने डेल्टाची जागा घेतली होती आणि तो जगभरात वेगाने पसरला होता.

कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी 'हे' करा?

  • जर तुम्हाला कोरोनाची काही लक्षणे जाणवत असतील तर घराबाहेर पडू नका.
  • संसर्गाच्या लक्षणांसह संघर्ष करणार्‍या लोकांपासून दूर रहा.
  • मास्क घातल्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
  • हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला स्पर्श करू नका, विशेषतः नाक, तोंड आणि डोळे.
  • गलिच्छ पृष्ठभागांना स्पर्श करणे टाळा.
  • घरातील किंवा शेजारील कोणी कोविड पॉझिटिव्ह असल्यास, लहान मुले आणि वृद्ध लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवा.

सध्या देशात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातचं कोविड XBB 1.16 च्या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. H3N2 हा मौसमी इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो, परंतु त्याचा फुफ्फुसांवर परिणाम होत नाही. तथापि, या विषाणूमुळे वृद्ध आणि आधीच आजारी लोकांना अडचणी येऊ शकतात. तर कोविडमुळे फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते. हे दोन्ही विषाणू टाळण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.