Cholera Cases in Maharashtra-Gujarat: महाराष्ट्र-गुजरातमध्ये कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ; पावसाळ्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी
Cholera प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Cholera Cases in Maharashtra-Gujarat: देशभरात मान्सून दाखल झाला असून दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. परंतु, मान्सूसोबतचं अनेक आजारांचा धोकाही वाढवला आहे. पावसाळ्यात विविध आजार उद्धभवतात. कॉलरा (Cholera) हा यापैकी एक आहे, ज्याचा प्रादुर्भाव आजकाल महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात दिसून येत आहे. पावसामुळे कॉलरा रुग्णांत (Cholera Patients) वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

कॉलरा हा एक गंभीर आजार आहे, जो अनेक प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कॉलराची लक्षणे, त्याची कारणे आणि प्रतिबंध याविषयी सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात. (हेही वाचा -Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता 70 वर्षांवरील वृद्धांनाही मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)

कॉलरा आजार होण्याचं नेमकं कारण काय?

तीव्र अतिसाराच्या आजाराला कॉलरा असे म्हणतात. हा रोग आतड्यांतील व्हिब्रिओ कॉलरा संसर्गामुळे होतो. खालील दूषित पाणी, अस्वच्छता, दूषित अन्न इत्यागी कारणांमुळे कॉलराची लागण होते. खालील मुद्द्यांच्या आधारे कॉलरा होण्याचे नेमके कारण सविस्तर जाणून घेऊयात. (हेही वाचा - H9N2 Bird Flu in India: पश्चिम बंगाल मध्ये 4 वर्षीय चिमुकलीला H9N2 Bird Flu; भारतातील दुसरा रूग्ण)

दूषित अन्न -

खराब झालेले किंवा दूषित अन्न हा कॉलरा पसरण्याचा मुख्य मार्ग आहे. जर एखादी आजारी व्यक्ती स्वच्छतेची काळजी न घेता अन्न तयार करत असेल किंवा व्हिब्रिओ कॉलरा असलेल्या पाण्यात अन्न तयार केले असेल किंवा स्वच्छ केले असेल तर असे अन्न खाल्ल्याने तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. याशिवाय कच्चे किंवा कमी शिजलेले सी-फूड आणि दूषित पाण्यात उगवलेल्या भाज्याही धोकादायक असतात.

दूषित पाणी -

Vibrio cholerae जीवाणूंनी दूषित पाणी प्यायल्याने देखील कॉलरा होऊ शकतो. हे देखील कॉलरा पसरण्याचे एक प्रमुख कारण आहे.

स्वच्छतेचा अभाव -

कॉलरा पसरण्याचा एक प्रमुख घटक म्हणजे स्वच्छतेचा अभाव.चुकीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रणालीमुळे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे व्हिब्रिओ कॉलरा जीवाणू पसरतात. सांडपाण्यात आढळणारा हा जीवाणू मोठ्या लोकसंख्येमध्ये वेगाने पसरू शकतो. जेव्हा हे जीवाणू पिण्यासाठी, खाण्यासाठी आणि धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी दूषित करतात तेव्हा ते साथीचा आजार पसरण्याची शक्यता असते. या जिवाणूंचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आणि हात धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा अभाव.

कच्चे किंवा कमी शिजवलेले सीफूड -

कच्चे किंवा कमी शिजवलेले सीफूड, विशेषत: व्हिब्रिओ कॉलरा असलेल्या भागातून शेलफिश खाल्ल्याने देखील हा आजार होऊ शकतो.

कॉलराची लक्षणे -

कॉलराची लक्षणे सामान्यतः संसर्ग झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांनी दिसतात आणि त्यांची तीव्रता सौम्य ते गंभीर असू शकते. तीव्र जुलाब हे त्याचे मुख्य लक्षण आहे. याशिवाय इतर काही गंभीर लक्षणांमध्ये उलट्या, निर्जलीकरण, कमी लघवी, पायाला पेटके येणे, आदी लक्षणं दिसून येतात.

कॉलरा प्रतिबंध -

कॉलरा टाळण्यासाठी स्वच्छता आणि काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ पाणी प्या. पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यातून जंतू काढून टाकण्यासाठी ते उकळून, क्लोरीनेशन किंवा गोळ्यांचा वापर करा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, स्वच्छतेच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. जंतू नष्ट करण्यासाठी वारंवार साबणाने हात धुण्याची सवय लावणे आवश्यक आहे. याशिवाय, अन्न चांगले शिजवून खा. साठवलेले अन्न आणि कच्चे किंवा कमी शिजवलेले सीफूड टाळा. याशिवाय, तोंडावाटे कॉलरा लसीकरण हा देखील हा आजार टाळण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.