Coronavirus केवळ फुफ्फुसांवर नव्हे तर मेंदू, हृद्य, किडनी सह शरीराच्या अन्य अवयवांवरही करतो घातक परिणाम; पहा COVID-19 चा रूग्णांच्या शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल संशोधकांचा अभ्यास काय सांगतो
coronavirus impacts (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने श्वसनाचा त्रास होतो. मात्र सध्या जगभरातील समोर आलेल्या अभ्यासानुसार, कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर मेंदू, हृद्य आणि किडनीवर देखील त्याचा परिणाम पहायला मिळतो. शरीरातील मज्जासंस्था आणि ज्ञानेंद्रियांची क्षमतादेखील मंदावते. कोरोना व्हायरस विषयी जसा संशोधकांचा अभ्यास वाढत आहे तसा त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणामांचं स्वरूप समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस मुलांवर हल्ला करताना Paediatric Inflammatory Disease बळावत असल्याची बाब समोर आली होती. अमेरिकेमध्ये 80 चिमुकल्यांमध्ये अशाप्रकारची लक्षण पहायला मिळाली सोबतच त्यांच्यामध्ये Kawasaki Disease चा त्रास झाला. Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून.

कोरोना व्हायरसने रूग्णाच्या शरीरात प्रवेश केल्याने त्यांच्या ज्ञानेद्रियांची क्षमता कमी झाल्याचं समोर आलं आहे. सुमारे 60% पेक्षा अधिक रूग्णांमध्ये चव घेण्याची, वास ओळखण्याची क्षमता कमी झाल्याचं समोर आल्याची माहिती लंडनच्या King’s College च्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा परिणाम किडनीआणि पचनक्रियेवरदेखील झाला आहे. Washington Postच्या माहितीनुसार नेफ्रोलॉजिस्ट (किडनी आरोग्यतज्ञ) रूग्णालयात दाखल झालेल्या निम्म्या कोरोनाबाधितांच्या मूत्रामध्ये रक्त किंवा प्रोटीन आढळलं आहे. काहींना डायलिसिसची मदत घ्यावी लागली म्हणजे त्यांच्या किडनीची कार्यक्षमता बिघडली होती. COVID Toes: लहान मुले आणि तरुणांचे पाय सुजणे ठरतय धोक्याची घंटा; जाणून घ्या कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणाविषयी.

कोरोनाबाधितामध्ये मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्याने डोकेदुखी, चक्कर येणं, काहीशी शुद्ध हरपणं असा त्रास जाणवतो. Journal of the American Medical Association च्या मज्जासंस्थेवरील परिणामामुळे कोव्हिड 19 च्या रूग्णाला स्ट्रोक किंवा आकडी येण्याचा त्रास जाणवतो.

कोरोना व्हायरसमुळे रक्तावरही परिणाम होतो. हा व्हायरस शरीरात आल्याने रक्ताच्या गुठळ्या होणं हे समोर आलं आहे अशी Wall Street Journalची माहिती आहे. कोरोना केवळ मेंदूवर नव्हे तर हृद्यावरही आघात करतो. हद्याचे ठोके अनियंत्रित होणे, मायोकार्डिटिसचा त्रास बळावतो. अशी माहिती Washington Post ने दिली आहे.