कोरोना व्हायरस सारख्या भीषण विषाणूशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र या रोगाची लक्षणे लवकरात लवकर कळावी यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास सुरु आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तज्ज्ञांना एक महत्वाचे लक्षण आढळून आले आहे. ते म्हणजे पाय सुजणे. ही लक्षणे बहुत करुन लहान मुले आणि तरुणांमध्ये आढळून येत आहे. या लक्षणाला 'COVID Toes' असे नाव देण्यात आले आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचे त्वचातज्ज्ञ डॉ. अॅमी पॅलेर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिकागो च्या बालरोग तज्ज्ञ डॉ. अॅन अँड रॉबर्ट ल्युरी यांच्याकडे अशा प्रकारचे बाल रुग्ण आढळून आले. ज्यांची पायांची बोटे सुजलेली दिसली, अशी माहिती पॅलेर यांनी दिली. यात अनेक लहान मुलांचे तसेच तरुणांचे तळपाय आणि पायाच्या बोटांना सूज आलेली दिसले. यांच्यात कोरोना ची लक्षणे दिसली. इतकेच नव्हे तर पायांना आलेली सूज आधी लाल आणि नंतर जांभळ्या रंगामध्ये बदलत असल्याचे दिसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. Coronavirus: कोरोना व्हायरस मराठी माहिती पुस्तिका पीडीएफ इथे पाहा, डाऊनलोड करा
इटलीमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या ठिकाणी ही समस्या सर्वात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आता मात्र ही समस्या फक्त इटलीपुरती मर्यादित राहिलेली नसून अमेरिकेतही अशी लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं आहे.
तरीही पालकांनी घाबरून न जाता मुलांची काळजी घ्यावी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. ही केवळ कोरोनाची लक्षणं असल्यामुळे यावर इलाज करता येऊ शकतो. शिवाय आम्हीही यावर अभ्यास करत असून लवकरच यावर तोडगा काढू असे पॅलेर म्हणाले.