Home Remedies For Constipation (Photo Credits: Pixabay)

Health Tips To Curb Constipation: पोट साफ तर दिवस चांगला! असं एक वाक्य आपणही कधी ना कधी ऐकलं असेल. पण अनेकांना हल्ली हा अनुभव घेता येत नाही. वेळेपेक्षा मूड वर आधारित असणारी जीवन शैली फॉलो करताना अनेकदा आपल्याकडूनही आरोग्याची हेळसांड होते. आता तर लॉकडाऊन (Lockdown) असल्याने कधीही खाणे आणि व्यायाम न करणे यामुळे अपचन होण्याची समस्या अगदी कॉमन झाली आहे. अनेकदा यामुळेच पोटात गॅस तयार होणे, करपट ढेकर येणे, उलट्या आणि हळूहळू गंभीर पोटाचे विकार सुद्धा उद्भवण्याची भीती असते. मात्र याही पेक्षा एक मोठा त्रास म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). शरीरातली मल बाहेर पडला नाही तर प्रत्येकवेळी अस्वस्थ वाटत राहते. असं होऊ नये यासाठी आज आपण असे काही सोप्पे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे जर का तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असेल तर यातील काही घरगुती उपचार नक्की करून पहा.. Health Tips: पोटातील गॅस चारचौघात मान खाली घालायला लावण्याआधीच 'या' घरगुती उपायांनी करा इलाज

बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण का होते मुळात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. शरीरात आवश्यक तिथे पाणी म्हणजेच लिक्विड उपलब्ध नसेल तर मल बाहेर येण्यास अडचण होते. तसेच मसालेदार खाणे,  एका ठिकाणी बसून काम करणे यामुळे हा त्रास अधिक जाणवतो. शरीरात औषधांचा मारा अधिक झाल्याने तसेच  याशिवाय जी मंडळी डाएटिंग च्या नावाखाली कमी जेवतात त्यांनाही असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार, भरपूर पाणी पिणे, व्यायाम करणे हा यावरील उत्तम उपाय आहे पण तरीही जर का हा त्रास होत असेल तर खालील उपाय ट्राय करा.

बद्धकोष्ठता वर आरामासाठी उपचार

- दररोज सकाळी गरम पाण्यातून लिंबू आणि एरंडेल तेल हे एकत्र करुन घ्यावे.

- दिवसातून शक्य होईल तितक्या वेळा कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यावे.

- रात्री झोपण्यापूर्वी गरम दुध प्यावे.

- पपई शिजवून खावे.

-फायबर युक्त अन्न खावे, पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा. पालक खाल्ल्यास अति उत्तम.

- रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो.

- जेवणानंतर आळशी आणि बडीशेपचा मुखवास घ्या.

-हिंगाचे पाणी प्या.

- मसालेदार जेवण केल्यास शतपावली करा.

दरम्यान, पोट स्वस्थ असल्यास वजनाच्या समस्या, हृदयाचे विकार असे मुद्दे कमी होतात. त्यामुळे हेल्थी पोटासाठी जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक आहे.

(टीप- हे घरगुती उपचार व सल्ले प्राप्त माहितीवर आधारित आहेत, तुम्हाला होणार त्रास अधिक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या)