Photo Credit: pixabay

उन्हाळ्यात आपल्या शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते.आपण या काळात जास्त पाण्याचे सेवन करतो. या ऋतुमध्ये लोक बहुतेकदा अशी फळे खाण्याचा विचार करतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत कलिंगड हे फळ लोकांची पहिली पसंतीअसते . कलिंगडातून शरीराला सुमारे 92 टक्के एवढे पाणी मिळते. कलिंगड खाण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु आज आम्ही आपल्याला आपल्या या लेखातून कलिंगडाच्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये जास्त प्रमाणात कलिंगडाचे सेवन करत असाल तर तुम्हाला काही समस्याही उद्भवू शकतात. जाणून घेऊयात काय आहेत त्या समस्या. (Health Tips: रोज एक ग्लास चण्याचे पाणी पिण्यास करा सुरु , होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे)

जास्त प्रमाणात कलिंगड खाण्याने होणाऱ्या समस्या

  • मधुमेह असणाऱ्यांना कलिंगड जास्त खाल्ल्यामुळे जास्त हानि होऊ शकते. खरं तर कलिंगडमध्ये बरीच नैसर्गिक साखर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. असे म्हणतात की मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

  • हृदयरोग्यांसाठी कलिंगड खूप हानिकारक आहे. कलिंगडमध्ये मध्य मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. अशा परिस्थितीत हे जास्त खाल्ल्याने हृदयाची अनियमित धडधड, वीक पल्स रेट यांसारख्या समस्या होऊ शकतात.

 

 

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)