Health Tips: दिवसाची सुरुवात जीरे आणि मेथीचे पाणी पिऊन केल्याने तुम्ही रहाल 'या' आजारांपासून दूर; जाणून घ्या फायदे 

मेथी आणि जीरे या अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या मुख्य मसाले आहेत. परंतु त्यांच्यापासून होणारे आरोग्याचे फायदेही बरेच आहेत. जर या दोघांना बरोबर घेतले तर ते केकवर आयसिंगसारखे कार्य करतात. परंतु त्यांच्या फायदा करुन घेण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात घेणे फार महत्वाचे आहे.

Health Tips: दिवसाची सुरुवात जीरे आणि मेथीचे पाणी पिऊन केल्याने तुम्ही रहाल 'या' आजारांपासून दूर; जाणून घ्या फायदे 
Photo Credit: file photo

जीरे आणि मेथी दाने यांच्यापासून पोषण मिळवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे जीरे आणि मेथीच्या दाण्याचे पाणी. जर तुम्ही सकाळी उठल्यावर जीरे आणि मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायलात तर अनेक आजरांपासून तुम्ही दूर राहु शकता. मेथी आणि जीरे या अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या मुख्य मसाले आहेत. परंतु त्यांच्यापासून होणारे आरोग्याचे फायदेही बरेच आहेत. जर या दोघांना बरोबर घेतले तर ते केकवर आयसिंगसारखे कार्य करतात. परंतु त्यांच्या फायदा करुन घेण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात घेणे फार महत्वाचे आहे.जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल किंवा तणाव कमी करायचा असेल किंवा तुम्हाला अपचनाची समस्या सोडवायची असेल तर आजपासून भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी व मेथीचे पाणी पिण्यास सुरुवात करा.

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे एक उत्तम डीटॉक्स पेय आहे.हे बर्‍याच रोगांना दूर करून शरीराला फिट करते. इतकेच नाही तर ते स्मरणशक्ती वाढविण्यात आणि मानसिक आजारांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला खूप मदत करू शकते.आज च्या लेखात आपण जाणून घेणार आहोत जीरे आणि मेथीच्या दाण्याचे फायदे. (Health tips: दुधात तूप टाकून पिल्याने होतात 'हे'अनेक फायदे ; वाचून तुम्हाला ही बसेल आश्चर्यचा धक्का)

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचारांपैकी एक म्हणजे जीरे आणि मेथीचे पाणी. ही एक प्राचीन पाककृती आहे, जी वजन कमी करण्यासाठी लोक वापरत आलेले आहेत .जीरे आणि मेथी दो मध्ये एंटीऑक्सीडेंट असतात जे मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासाठी मदत करतात.या पेयमध्ये चरबी जळण्याचे गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी सहजपणे कमी होण्यास मदत होते. जर आपण वेगवान वजन कमी करण्याचा विचार करीत असाल तर नक्कीच आपल्या रोजच्या नित्यकर्मात या डीटॉक्स ड्रिंकचा समावेश करा.

रक्तातील साखर नियंत्रित होईल

जीरे आणि मेथीचे पाणी मधुमेहावरील रामबाण उपाय आहे. जर आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होत राहिली किंवा वारंवार वाढत राहिली तर आपल्यासाठी हे एक उत्कृष्ट डीटॉक्स पेय आहे. बॅड कोलेस्ट्रॉलसह जळजळ कमी करण्यासाठी हे ओळखले जाते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी कोणी हीजीरे -मेथीचे पाणी पिऊ शकते. या डीटॉक्स पेयमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी -1, बी -3, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात. हे सर्व आवश्यक घटक शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस बळकट करण्यासाठी प्रभावी आहेत. हे पेय सेवन केल्यास आपणास हंगामी सर्दी, खोकला आणि फ्लूपासून संरक्षण मिळेल.

चमकणारी त्वचा मिळवा

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी जीरे आणि मेथीचे पाणी उपयुक्त मानले जाते. नियमितपणे हे पेय सेवन केल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते, तसेच रक्त परिसंचरण सुधारते. यामुळे त्वचेचे रोग आणि त्वचेवर दिसणारे मुरुम, बारीक ओळी, सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे ते निरोगी असण्याबरोबर चमकू लागते.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 03:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).