प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Health Tips: शरिरातील हाडांच्या बळकटींसाठी कॅल्शिअमची अत्यंत गरज असते. त्याचसोबत शरिराचा एकूणच विकास आणि मसल्स बनवण्यासाठी कॅल्शिअमचे फार मोठे योगदान असते. हिरव्या भाज्या, दही, बदाम आणि पनीर यांच्यामधून तुम्हाला कॅल्शिअम मिळू शकते. परंतु शरिरात जर कॅल्शिअमची कमतरता असेल तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे शरिराला कॅल्शिअमचा पुरवठा कसा करता येईल याची काळजी घ्या.

शरिरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असण्याला हायपोकॅल्शिमिया असे म्हटले जाते. हे अशावेळी होते जेव्हा तुमच्या शरिराला पूर्णपणे कॅल्शिअम मिळत नाही. या व्यतिरिक्त शरिरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर डॉक्टरांना विचारुन औषध घ्या आणि अधिक प्रमाणात फूड सप्लीमेंटचे सेवन करणे सुद्धा टाळावे.(Lucknow च्या City Hospital मध्ये लहान मुलावर पार पडली जटील शस्त्रक्रिया; कवटीचं हाड केलं दुरूस्त)

वाढत्या वयासोबत कॅल्शिअमची कमतरता भासणे ही सामान्य बाब आहे. शरिरात बहुतांश प्रमाणात कॅल्शिअम हे हाडांमध्ये असते. वाढत्या वयामुळे शरिरातील हाडांची झिज होते आणि ते सक्षम पद्धतीने काम करु शकत नहीत. अशावेळी कॅल्शिअमची गरज भासते. त्यामुळे तुम्ही कॅल्शिअमचा स्रोत असलेल्या गोष्टींचे सेवन करावे.

>कॅल्शिअमची कमतरता का निर्माण होते?

उपाशी राहिल्यास किंवा कुपोषण, हार्मोन मध्ये बदल, प्रिमॅच्युअर डिलिव्हरी, मॅलएब्जरेब्शनच्या कारणामुळे कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ शकते. तर जाणून घ्या कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

- शरिरात हिमग्लोबिनसह पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे जर तुम्हाला नेहमीच मसल क्रॅम्पची समस्या जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शिअमची कमतरता असल्याचे संकेत आहेत.

-आपल्या शरिरात 90 टक्के कॅल्शिअम हे दात आणि हाडांमध्ये असते. परंतु त्याच्या कमतरतेमुळे दात आणि हाड दुखण्यास सुरुवात होते.

-कॅल्शिअमच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महिलांना मासिक पाळीच्या वेळी खुप दुखते. कारण कॅल्शिअम स्नानूंच्या कार्यामध्ये महत्वाची भुमिका बजावते.

-कॅल्शिअम शरिरात रोगप्रतिकारक क्षमता तयार करते. परंतु त्याची कमी असेल तर रोगांचा सामना करण्यासाठी आपण असक्षम ठरतो.

तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात, जसे की डोक्यावर दाब पडल्यामुळे चक्कर येणे आणि डोकेदुखी. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नैराश्य, निद्रानाश, व्यक्तिमत्त्व बदल आणि स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरिरात कॅल्शिअमची कमतरता भासत असेल तर