Lucknow च्या City Hospital मध्ये लहान मुलावर पार पडली जटील शस्त्रक्रिया; कवटीचं हाड  केलं दुरूस्त
Surgery. (Photo Credits: ANI | Representational Image)

लखनऊ (Lucknow) मध्ये एक मेडिकल मिरॅकलची घटना समोर आली आहे. सिटी हॉस्पिटलमध्ये चक्क एका लहान मुलाच्या कवटीच्या हाडाला पुन्हा जुळवण्याची कठीण शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. यामध्ये porous polyethylene चा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रायबरेली मध्ये हा मुलगा छप्परावरून पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. ही घटना जानेवारी 2020 ची होती.

लहान मुलाला तात्काळ Apollomedics Super Specialty Hospital च्या न्युरोसर्जरी विभागात आणण्यात आले. मुलगा पडल्याने त्याच्या डाव्या मेंदुच्या खोपडीतल्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याचं डॉ. सुनील कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. पण त्यावेळी जीव वाचवणं हे प्राधान्य होतं. त्यावेळी इतकी कठीण शस्त्रक्रिया करण्यासाठी तो खूपच लहान होता. असेही डॉक्टर सांगतात.

न्युरोसर्जरी मध्ये कवटी मधील एक भाग काढून टाकला जातो ज्यामुळे मेंदुला आलेल्या सूजेला जागा मिळावी. नंतर strewn bone काढला जातो आणि मुलगा जेव्हा मोठा होईल आणि शस्त्रक्रिया पेलू शकेल तेव्हा तो पुन्हा लावला जातो. या मुलाच्या बाबतीमध्ये कवटी सील करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही. नंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की हाड शरीराकडून स्विकारले जात नाही. तेव्हा इम्प्लांट्सचा वापर करण्यात आला. लहान मुलं जशी मोठी होतात तसा त्यांच्या शरीराचाही विकास होतो. या लहान मुलाच्या बाबतीत इम्प्लाट्स लावल्यास ते वाढू शकत नाही त्यामुळे बायोमटेरियल इम्प्लांट जे porous polyethylene पासून बनवले जातात त्यांचा विचार करण्यात आला.

नोव्हेंबर 2021 मध्ये मुलावर पुन्हा शस्त्रक्रिया झाली. गुरूवार (10 फेब्रुवारी) दिवशी त्याला फीट जाहीर करण्यात आले. पुढील काही महिने त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. Baby with 4 Hands 4 Legs: आश्चर्यम! भारतामध्ये जन्माला आले 4 हात व 4 पाय असलेले बाळ; डॉक्टर म्हणतात, वैद्यकीय शास्त्रातील चमत्कार .

हॉस्पिटलचे सीईओ आणि एमडी डॉ. मयांक सोमाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारे युपी मध्ये झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. मुंबई, दिल्ली मध्ये अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. बायो इम्प्लांट मुळे डोक्याचा आकार बदलत किंवा मोठा होत नाही.