Baby with 4 Hands 4 Legs: आश्चर्यम! भारतामध्ये जन्माला आले 4 हात व 4 पाय असलेले बाळ; डॉक्टर म्हणतात, वैद्यकीय शास्त्रातील चमत्कार
Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

बिहारमधील (Bihar) कटिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील सदर रुग्णालयात एका अशा बाळाचा जन्म झाला आहे, ज्याला चार हात आणि चार पाय (4 Hands 4 Legs) असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलाला पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये जमा होत आहेत. या मुलाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक याला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक वेळा अशी मुले जन्माला येतात जी असामान्य असतात. अनेक लोक याला देवाचा अवतार मानत आहेत.

मुलाच्या जन्माबाबत नातेवाईकांचा आरोप आहे की, त्यांनी डिलिव्हरीआधी खासगी दवाखान्यात तीन ते चार वेळा अल्ट्रासाऊंड केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मुलाच्या प्रकृतीबाबत स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. बाळ निरोगी आणि तंदुरुस्त असल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली. गर्भधारणेदरम्यान हो गोष्ट समजली असती तर, त्याला त्याचवेळी काढले असते. आता ऑपरेशनच्या सहाय्याने बाळाला गर्भातून बाहेर काढण्यात आले. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. परंतु मुलाला चार पाय, चार हात असल्याने तो परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. (हेही वाचा: Sahara Desert येथील वाळवंटात बर्फवृष्टी, फोटो सोशल मीडियात व्हायरल)

हफलगंज येथील गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने कटिहार सदर रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे तिने या अद्भुत मुलाला जन्म दिला. दुसरीकडे सदर हॉस्पिटलच्या लेडी डॉक्टर शशी किरण यांनी सांगितले की, यात अद्भूत, आश्चर्य किंवा देवी चमत्कार असे काहीही नाही. अशा घटना वैद्यकीय शास्त्रात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. याआधीही बिहारमधील गोपालमध्ये असेच प्रकरण समोर आले होते. जिथे एका महिलेने तीन हात आणि तीन पाय असलेल्या मुलाला जन्म दिला होता.