Health Tips: गुडघे आणि कंबर दुखी वर गुणकारी ठरतील '5' घरगुती उपाय
Knee Pain (Photo Credits: PixaBay)

दिवसेंदिवस बदलत जाणारी जीवनशैली आणि धकाधकीचे जीवन यांसारखे याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवायला लागत आहे. त्याच्यातूनच कंबरदुखी (Back Pain), गुडघेदुखी (Knee Pain) या समस्या वारंवार डोकं वर काढू लागल्या आहेत. यावर कितीही औषधोपचार केले तरी गुडघेदुखी, कंबरदुखी काही थांबत नाही असे अनेकांचे म्हणणे असते. अशा वेळी ब-याचदा लोक Pain Killer घेऊन अशा दुखण्यावर तात्पुरता इलाज करतात मात्र त्यावेळी ते हे विसरून जातात की याचा अतिरिक्त वापराने त्यांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होई शकतो.

अशावेळी कामी येतात ते फक्त घरगुती उपाय, असे उपाय ज्याने शरीरावर काही दुष्परिणाही होणार नाही आणि आपले गुडघेदुखी आणि कंबरदुखी ही थांबण्यास मदत होईल.

पाहा '5' घरगुती उपाय:

1) जवस: रोज जेवण झाल्यावर बडीशेप ऐवजी जवस खा. जवस खाल्ल्याने शरीरात नवऊर्जा निर्माण होते आणि गुडघेदुखीचा त्रासही काही प्रमाणात कमी होतो.

2) पांढरे तीळ: पांढरे तिळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात त्यामुळे आपल्याला कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. Winter Food Tips: थंडीत पपईचे अतिसेवन केल्यास होऊ शकतात हे '5' आजार

3) एरंडेल तेल: भाकरीच्या गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घ्या. त्याची भाकरी 15 दिवस रोज रात्री जेवताना खा. गुडघेदुखी, पाठदुखी कमी होईल.

4) बाभळीची साल: बाभळीची साल पाण्यात टाकून ती चांगली उकळवा. त्या पाण्याने गुडघे किंवा पाय दुखत असेल त्याभागावर टाका. 10 मिनिटांत फरक पडतो. लहान मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी करा 'हे' उपाय

5) तिळाचे तेल: तुमचे गुडघे दुखत असल्यास तिळाचे तेल सकाळ-संध्याकाळ थोडे थोडे प्या. त्यावर कोमट पाणी प्या. 15 दिवसांत गुडघेदुखी थांबण्यास मदत होईल.

हे सर्व उपाय घरगुती जरी असले तरी तुम्हाला काही शरीरासंबंधी काही त्रास किंवा आजार असेल तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)