![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/12/baby-care-380x214.jpg)
थंडीचे दिवस जवळ आले असून या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपाय केले जातात. तर खासकरुन लहान मुलांची या काळात अधिक काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण थंडीत तापमानाचा पारा खाली उतरल्याने सर्वत्र गारवा परसतो. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारी पडण्याची अधिक शक्यता असते. तसेच थंडीच्या दिवसात लहान मुलांना उबदार कपडे घातले जातातच पण विविध प्रकारे सुद्धा त्यांची काळजी घेतली जाते.
तर लहान मुलांना उबदार कपडे घालावेत पण त्यांना अधिक जाड असलेले कपडे घालू नयेत. कारण असे कपडे घातल्यास लहान मुलांना चालण्यास अडथळा येतो. त्याऐवजी हलके उबदार कपडे घातल्यास त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल. त्याचसोबत लहान मुलांच्या पायाला थंडी लागू नये म्हणून मऊ असे बेबी शूज घालावेत. मात्र लक्षात असू द्या लहान मुलांना घालण्यात येणारे शूज हे कापडी असावेत. एवढेच नाही आजकाल बाजारात थंडीपासून बचाव करण्यासाठी लहानांसाठी सुद्धा जॅकेट्स येतात. परंतु हे जॅकेट्स वापरण्याऐवजी त्यांना लोकरीची टोपी घालावी.(Winter Food: मक्याच्या पिठाची पोळी खाल्ल्याने शरीराला मिळतात आवश्यक सत्व; जाणून घ्या 'हे' भन्नाट फायदे आणि रेसिपी Watch Video)
थंडीच्या दिवसात लहान मुलांना घराबाहेर जास्त काळ फिरायला घेऊन जाणे टाळा. कारण बाहेरील वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासोबत समतोल राखू न शकल्यास ते आजारी पडू शकतात. तसेच झोपेच्या वेळेस त्यांच्या अंगावर जड पांघरुण टाकू नका. त्यापेक्षा सुती किंवा ब्लॅंकेटचा वापर करा. तर थंडीत लहान मुलांचा काळजी घेण्यासाठी खासकरुन त्यांची खोली कशी उबदार राहिल याकडे जास्त लक्ष द्या. यासाठी तुम्ही हिटर्सचा वापर करु शकता पण हिटर्स वापरताना त्याचा संबंध लहान मुलांशी येणार नाही ना याची काळजी अधिक घ्या.