Makke Di Roti (Photo Credits: Instagram)

थंडी (Winter)  सुरु होताच आपल्या भुकेचे प्रमाण देखील वाढू लागते, अशा थंड वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच . ऋतूत होणारे बदल पाहता या मोसमात स्निग्ध पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच शरीराला पोषक तत्वे देण्याऱ्या डाळी, प्रथिनांचा देखील आहारात समावेश केला जातो. यापैकीच एक प्रकार म्हणजे मक्याची पोळी (Makke Di Roti). पंजाब प्रांतात थंडीच्या मोसमात तर सरसो दा साग या पारंपरिक रेसिपीसोबत  मक्के की रोटी अगदी  आवर्जून खाल्ली जाते.  मक्याच्या पिठात मीठ आणि पाणी घालून अगदी झटपट बनणाऱ्या या पदार्थात अनेक व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. यंदा हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली असताना आज आम्ही आपणाला मक्याच्या पोळीचे काही असेच भन्नाट फायदे सांगणार आहोत.

मका का खावा हे जाणून घेण्याआधी या मक्याचे मूळ आपल्याला माहित आहे का?  मका हे मूळ धान्य दक्षिण मध्य अमेरिकेतले आहे, तिथल्या अ‍ॅझ्टेक आणि मायन संस्कृतीच्या मुळाशी हे पीक असून ख्रिस्तपूर्व काळापासून इथे मका पेरला जात आहे.टॉर्टिला या नावाने जगभर प्रसिद्ध असणारा हा पदार्थ म्हणजे अन्य काही नसून मक्याच्या पिठाची जाडसर भाकरी आहे. आजही भारतापासून पाकिस्तान पर्यंत तसेच युरोपियन देशात देखील मक्याची रोटी,पोळी, भाकरी किंवा ब्रेड अशा नावाने हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. अगदी जगभर ख्याती असणाऱ्या या पदार्थाचे फायदेही तितकेच खास आहेत.. चला तर मग जाणून घेऊयात मक्याच्या पोळीचे फायदे...

पचनक्रिया सुधारते

थंडीत अनेकांना पचनाचा त्रास होतो, याकडे वेळीच त्रास न दिल्यास हा नेहमीचाच बद्धकोष्ठतेचा त्रास बनू शकतो. अशावेळी मक्याची पोळी आपल्या मदतीस येईल. मक्याच्या पिठात  भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ते पचायला अगदी हलके असते तसेच या मुबलक फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

हृदयासाठी मका आहे बेस्ट

मक्याच्या पिठाच्या पोळीने कॉलेस्ट्रॉल कमी होते ज्यामुळे हृदय बळकट होण्यास मदत होते. मक्याच्या पिठात ओमेगा-3 फॅटी एसिड असल्याने कार्डियोव्हॅस्क्युलर आजार, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक सारखे संभाव्य धोके कमी होतात.

Onion Price Hike: कांद्याशिवायही चविष्ट बनतात हे '5' पदार्थ मग त्याच्या चढ्या दराचं टेन्शन कशाला?

ग्‍लूटेन-फ्री

अनेकांना  ग्लूटेन इनटॉलरन्सची समस्या असते. त्यामुळे गव्हाचं पीठ खाणे शक्य होत नाही. अशावेळी मक्याचं पीठ हा उत्तम पर्याय ठरतो. मक्याचं पीठ हे ग्लूटेन-फ्री असते

एनिमिया वरील उपाय

हिमोग्लोबिन किंवा रेड ब्लड सेल्सच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो. यालाच एनिमिया म्हणून ओळखले जाते. महिला आणि वाढत्या वयातील मुलांमध्ये  एनिमियाचा त्रास तर फार कॉमन असतो. मक्याच्या पीठात असणाऱ्या बीटा-कॅरटीन पोषक तत्त्वामुळे रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत होते परिणामी एनिमियाच्या त्रासातून सुटका होते.

गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर

मक्याच्या पोळीत फॉलेट आणि व्हिटॅमीन-बी असते.गरोदर महिलेला हे पोषक तत्व मिळाल्यास तिच्या शरीराला तसेच गर्भाला देखील वाढीत मदत होते.

मक्याच्या पोळीची रेसिपी

काय मग हे इतके फायदे पाहून तुम्हालाही मक्याची पोळी खायची इच्छा होतेय ना? वाट कसली बघताय यंदाच्या थंडीपासूनच या बहुगुणी मक्याला आपल्या जेवणाच्या ताटात स्थान द्या. या झटपट रेसिपीमुळे तुमचा वेळ तर वाचेलच पण त्यातील भन्नाट गुणांमुळे तुमचे आरोग्य देखील सुधृढ व्हायला मदत होईल.