दिवसेंदिवस कांद्याचे भाव हे जणून उच्चांक गाठत असताना दिसत आहे. सध्या काही भागात 150 रुपये किलो कांदा झाल्याने सामान्य जनतेचे अक्षरश: कंबरडं मोडलं असून हॉटेल, रिसॉर्ट, खाणावळ चालवणारी व्यावसायिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. कांद्याशिवाय ज्यांचे पान हालत नाही अशा लोकांनी आता मांसाहारावर किंवा शाकाहारावर ताव मारायचा कसा असा प्रश्न अनेक खवय्यांना पडला असेल. घरात जेवण बनवायचे तरी काय असा प्रश्न अनेक गृहिणींना पडेल. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच कांद्याशिवाय बनवल्या जाणा-या रेसिपीजचा शोध घेणे.
होय कल्पना थोडी विचित्र वाटत असली तरीही आता कांद्याचे चढे भाव पाहता दुसरा पर्याय नसल्याचेच चित्र दिसतय. चला तर पाहूयात कांद्याशिवाय बनणा-या '5' रेसिपीज:
1. कोबीच्या वड्या
2. बटर पनीर
हेदेखील वाचा- कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते माहितेय? जाणून घ्या कारण
3. जैन झुणका
4. दुधीचा भरता
5. राजमा
कांद्याशिवाय एखादा पदार्थ खाणे जरी आपल्याला जड जात असेल तरी त्याची किंमतीचा आकडा लक्षात ठेवून ते खाण्याचा प्रयत्न केलात तर उत्तम नाही का?