वाढत्या गर्मीत Food Poisoning होण्याची शक्यता, बचाव करण्यासाठी करा 'हे' उपाय
(Photo credits: Facebook)

वाढत्या गर्मीमुळे आरोग्याच्या समस्या ही वाढतात. तर सर्वाधिक गर्मीमुळे हीट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्याचसोबत अन्नविषबाधा सुद्धा होते. तसेच उन्हाळ्यात वारंवार लघवी होणे, शरीरात पाण्याची कमतरता या गोष्टींमुळे आजारी पडण्यास कारणीभुत ठरतो. मात्र आपण जर ऐन उन्हाळ्यात आरोग्यासंबंधी काळजी घेतल्यास यांसारख्या आजारांपासून दूर राहू शकतो.

चक्कर येणे, अत्याधिक तहान लागणे, अशक्तपणा, डोके दुखी आणि अस्वास्थपणा सारखी लक्षणे दिसून येतात. याच्यावर उपाय म्हणून थंड पेये पिणे किंवा पाण्याने आपली तहान भागवणे. तर बॅक्टेरियुक्त अन्न खाल्यास आपल्याला अन्नविषबाधा होण्याची शक्यता फार असते. त्यामुळे अन्नपदार्थ शिजवताना साफ-सफाईकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.

तर गर्मीमध्ये अन्नविषबाधा पासून बचाव करण्यासाठी

-खाण्यासंबंधीत दुर्लक्ष करु नये.

-तसेच रस्त्यावरील उघडे पदार्थ खाण्याचे टाळावे.

-अन्न योग्य आणि साफ असलेल्या ठिकाणी बनवलेले नसल्यास अन्नविषबाधा होण्याची शक्यता असते.

-तर अतिशय उष्ण वातावरणामुळे अन्नपदार्थातील बॅक्टेरिया जलद गतीने वाढतात. त्यामुळे अशा परिस्थितीत खाण्याबद्दल सर्वांनी सावधानता बाळगली पाहिजे.

(फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी काही उपाय; दूर होतील आरोग्याच्या अनेक समस्या)

तसेच घरगुती उपायांच्या माध्यमातून सुद्धा अन्नविषबाधा होण्यापासून बचाव करु शकता. त्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन, अन्नपदार्थात आले, जीरे याचा वापर करा.