Heart Attack, Coronavirus (Photo Credit -pixabay)

नायजेरियन-अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकेल ओजो (Michael Ojo) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर मायकेलने कोरोनावर यशस्वी मात केली होती. परंतु, त्यानंतर काही दिवसातचं त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि प्रशिक्षण घेतानाचं त्याचा मृत्यू झाला. ओजो 27 वर्षांचा होता. यापूर्वी त्याला हृदयरोगाचा त्रास नव्हता. त्यामुळे अशा अनेक उदाहरणांमुळे लोकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. कदाचित तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, खरचं कोरोना व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या हृदयावर परिणाम करतो का? या गोष्टीवर प्रकाश टाकताना अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट एरिक टोपोल यांनी म्हटलं आहे की, अनेक अशी प्रकरणं दिसून आली आहेत, ज्यात कोरोनाची लक्षणं कमी किंवा अजिबात नव्हती. परंतु, तरीदेखील त्या व्यक्तीला हृदयरोगाचा झटका आला.

एरिक टोपोल यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये असे नमूद केले आहे की, कोरोना व्हायरस तीव्र श्वसन सिंड्रोममुळे (SARS-CoV-2), हृदयाच्या ट्रोपिज्मला चिन्हाकिंत केलं आहे. परिणामी मायोकार्डिटिस (हृदयावर सूज) दिसून येते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारची समस्या कोरोना विषाणूची कमी लक्षणं असणाऱ्या रुग्णांमध्येही दिसून येतात. अलीकडील शोधांमुळे तरुण एथलीट्समध्ये हृदयाशी संबंधित रोग उघडकीस आले आहेत. ज्यात अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. (हेही वाचा - Coronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO)

थकवा, श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे, हृदय गती असामान्य होणे, आदी लक्षणं अनेक व्यक्तींमध्ये दिसून येतात. या रुग्णांना मुख्यतः हृदयविकाराची समस्या दर्शवतात. कोरोना विषाणू प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतो. याशिवाय मायोकार्डिटिस हृदयाची गती आणि विद्युत सिग्नल पाठविण्याच्या क्षमतेस कमकुवत करते. मायोकार्डिटिसच्या गंभीर स्वरूपामुळे असामान्य हृदयाची लय, हृदयाच्या स्नायूंचे आजार आदी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

जर्मनीच्या फ्रँकफोर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, कोरोनाची बाधा झालेल्या अर्ध्याहून अधिक रुग्णांना ह्रदयरोगाचा त्रास आहे. मात्र, यातील अनेकांनी कोरोनावर मात केली. याविषयी बोलताना डॉ. शर्मा यांनी नमूद केलं की, कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांदेखील हृदयरोगाचा त्रास होण्याची शक्यता असते. (हेही वाचा - COVID-19 Vaccine Update: रशियामध्ये कोरोनावरील Sputnik V लस देशवासियांसाठी उपलब्ध करण्यास सुरूवात- रिपोर्ट्स)

जर तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल तर, तुम्ही स्वत: ला जाणवणाऱ्या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणं आवश्यक असून नियमितपणे डॉक्टरांशी संपर्काक राहणं गरजेचं आहे. अत्यंत थकवा, श्वास घेण्यास त्रास, सूज, छाती दुखणे आदी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करणं आवश्यक आहे.