WHO Logo (संग्रहित संपादित प्रतिमा)

Coronavirus Vaccine:  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी कोरोना व्हायरसचे महासंकट वाढत असल्याचे पाहता एक मोठे विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीबीसीच्या मते, डब्लूएचओचे आपत्कालीन प्रमुख माइक रायन यांनी शुक्रवारी असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर हा आकडा अजून वाढू शकतो.(COVID-19 Vaccine Update: रशियामध्ये कोरोनावरील Sputnik V लस देशवासियांसाठी उपलब्ध करण्यास सुरूवात- रिपोर्ट्स)

चीन येथे कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर जगभरातील कोविड19 मुळे मृतांचा आकडा वेगाने 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रायन यांनी युरोपीयन लोकांना स्वत:लाच विचारण्यास सांगितले की, त्यांनी लॉकडाऊन पासून बचाव करण्यासाठी काय योग्य पावले उचलली पाहिजेत. तसेच त्यांनी असा प्रश्न ही केला ही, सर्व ऑप्शन लागू केले होते? जसे चाचणी, ट्रेसिंग, क्वारंटाइन, आयसोलेशन, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क घालणे आणि हाथ धुणे.(Coronavirus: सौदी अरेबियामध्ये 450 भारतीयांवर भिक मागण्याची वेळ; कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनने हिरावून घेतला रोजगार, डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी)

यापू्र्वी स्पेनची राजधानी मॅड्रिडने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आणखी आठ जिल्ह्यात कठोर नियम करण्यात यावे जे शहरातील 10 लाख लोकांना प्रभावित करतात. फ्रान्समधील दक्षिण शहर मार्सिले मझ्ये बार आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालये बंद करण्याचा विरोध केला आहे. तर ब्रिटेन मध्ये दैनिक संक्रमणाची प्रकरणे वाढण्यासह काही क्षेत्रात कठोर नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.