COVID-19 Vaccine Update: रशियामध्ये कोरोनावरील Sputnik V लस देशवासियांसाठी उपलब्ध करण्यास सुरूवात- रिपोर्ट्स
Sputnik V vaccine | (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

रशियाने (Russia) कोरोना विषाणूवर प्रभावी ठरलेली स्पुतनिक व्हि लसीचे (Sputnik V) आता लोकांमध्ये वितरण करण्यास सुरुवात केली आहे. जगातील कोरोनावरील संभावित लस आता राजधानी मास्कोच्या लोकांसाठी उपलब्ध आहे, असा दावा रशियातील स्टेट मिडियाने आज आपल्या वृत्तात केला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. महत्वाचे म्हणजे, जगभरातील लगभग सर्वच देश कोरोनावरील लस शोधण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र, लवकरात लवकर लस तयार करून त्याचे वितरण करण्याकडे अधिक जोर दिला आहे.

स्पुतनिक व्ही या एडिनोवायरस वेक्टर-आधारित लसीला द गामाले साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजी द्वारा विकसित करण्यात आले आहे. रशियाने 11ऑगस्ट रोजी कोरोवरील लस स्पुतनिक हीचे नोंदणी केली होती. यूएनच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन कोरोना या लसी स्पुतनिक व्हीचे कौतुक केले. रशियाची कोरोना लस बर्‍यापैकी सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. स्पुतनिक व्ही लस ही जगातील पहिली कोरोना लस आहे, असे पुतीन म्हणाले आहेत. तसेचरशियामध्येही अशी चाचणी विकसित केली गेली आहे जी कोरोना विषाणूचा त्वरित निदान करते. हे देखील वाचा- Coronavirus Sniffing Dogs: ऐकावे ते नवलच! 'या' देशात कुत्र्यांना दिले खास प्रशिक्षण, फक्त वासावरून ओळखणार कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण; विमानतळावर तैनात

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण जगात पसरले आहे. जगभरात आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 58 हजार 747 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 कोटी 37 लाख 98 हजार 814 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 9 लाख 84 हजार 396 जणांचा मृत्यू झाला आहे.