Yoga Poses to Cure Diabetes: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल बहुतेक लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत. मधुमेहामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या मते, अनियंत्रित रक्तातील साखरेचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होतो. हृदय, मूत्रपिंड, डोळे, रक्तवाहिन्या आणि नसा यांसारख्या अंतर्गत अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. मात्र, जीवनशैलीत बदल करून या आजारावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते. भारतात हा आजार झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे मधुमेहाबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहींनी औषधोपचारांसोबत जीवनशैलीत बदल करून या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. चला जाणून घेऊया 3 योगासने, जी रोज केल्याने मधूमेह नियंत्रित करता येतो.
कपालभाती-
कपालभाती प्राणायाम मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या शरीरातील नसा आणि मज्जातंतू मजबूत करण्यासोबतच शरीरातील ऊर्जाही टिकवून ठेवते.
अनुलोम विलोम -
आजकाल बहुतेक घरातील लोक उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त आहेत. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कपालभाती आणि अनुलोम विलोम खूप फायदेशीर मानले जातात. कपालभाती आणि अनुलोम विलोम रोज 15 ते 20 मिनिटे केल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. याशिवाय, हे हार्मोनल असंतुलन संतुलित करण्यास देखील मदत करते.
बालसन-
तुम्ही बालसन योग कुठेही, कधीही करू शकता. या आसनाला लहान मुलांची मुद्रा असेही म्हणतात. बालासन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. बालसन हे सामान्यतः तणाव कमी करण्यासाठी ओळखले जाते, परंतु प्रत्यक्षात याचा मधुमेहाच्या रुग्णांना देखील खूप फायदा होतो.