दिल्ली (Delhi) येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल अर्धा क्विंटल इतक्या वजनाची गाठ काढली आहे. अर्धा क्विंटल म्हणजेच 50 किलोग्रॅम वजनाची गाठ पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार ही गाठ ओवेरियन ट्यूमर (Ovarian Tumour) प्रकारातील आहे. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) व्यवस्थापनाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की दिल्ली येथील एक महिला लक्ष्मी (नाव बदललेले आहे.) हिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच तिच्या पोटाच्या खालच्या भागात तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे तिच्या हिंडण्याफिरण्यावरही मर्यादा आल्या होत्या. अशा स्थिती उपचारांसाठी तिला इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
उपचारापूर्वी डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली असता महिलेच्या गर्भाषयात (ओव्हरी) एक मोठी घाठ असल्याचे आढळले. ही गाठ दिवसेंदिवस अधिकच मोठी होत चालली होती. त्यामुळे महिलेच्या आतड्यांवर दाब निर्माण होत होता. हा दाब वाढला की महिलेला अतिशय वेदना होत असत. पोटदुखी, श्वसनास त्रास, चालताना आणि झोपतानाही या महिलेला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असे. (हेही वाचा, महिला आणि बाल रूग्णालयाचा गलथानपणा; प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी)
सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी अॅण्ड बेरिएट्रिक सर्जरीचे वरिष्ट सल्लागार डॉ. अरुण प्रसाद यांनी सांगितले की एक शल्यविशारद म्हणून माझ्या आजवरच्या 30 वर्षांहून अधिकच्या काळात मी कधीही अशा प्रकारची घटना पाहिली नाही. ना कधी इतक्या मोठ्या प्रकारची गाठ पाहिली नाही. ही गाठ महिलेच्या एकूण वजनाच्या जवळपास अर्धा टक्के होते.
गेल्या काही काळापासून महिलेचे वजन सातत्याने वाढत होते. या महिलेचे वजन तब्बल 106 किलोग्रॅम इतके झाले होते. महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळीही कमी झाली होती. त्यामुळे एनीमियाचा त्रासही या महिलेला होत होता. डॉक्टरांच्या एका पथकाने या महिलेवर शस्त्रक्रिया केली. तब्बल साडे तीन तास शस्त्रक्रिया केल्यावर महिलेच्या पोटातील 50 किलो वजनाची गाठ काढण्यास डॉक्टरांना यश आले.
डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, लेप्रोस्कॉपी किंवा रोबोटच्या सहाय्याने विविध उपकरणे वापरुन महिलेच्या शरीरात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यही महिलेच्या पोटात सरकविण्यासाठी जागा नव्हती. त्यामळे ही शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने करावी लागल्याचेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले. गैस्ट्रोएंटरोलॉजी, स्त्री रोग तज्ञ आणि एनेस्थिसियोलॉजीस्टचाही या शस्त्रक्रियेवेळी पथकात समावेश होता.