COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

जगभरात काही देशांमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता भारतामध्येही आता प्रशासन अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. नागरिकांना कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याच्या, कोविड 19 लस घेण्याचं आवाहन केले आहे. देशात बुस्टर डोस घेतलेल्यांचं प्रमाण पाहता आता त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. The Insurance Regulatory and Development Authority of India कडून आता कोविड 19 लसीचे 3 डोस घेतलेल्यांना आपली इन्श्युरंस पॉलिसी रिन्यू करताना काही सूट देण्याच्या सूचना पॉलिसी कंपन्यांना दिल्या आहेत. सोबतच लाईफ आणि नॉन लाईफ इंश्युरंस कंपन्यांना कोविडशी संबंधित क्लेम्स हे कमीत कमी पेपर वर्क आणि लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड 19 बाबत जागृकता निर्माण करण्यासाठी रेग्युलेटर कडून इश्युरर कडून काही आमिषं पॉलिसी होल्डर्सना देण्यास सांगितलं आहे. तसेच त्यांच्या वेलनेस नेटावर्क कडून आरटीपीसीआर टेस्ट करण्यासही सांगितली आहे. यासाठी सोशल मीडीयाचा वापर करण्याच्याही सूचना आहेत. नक्की वाचा: Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना; तातडीने COVID Appropriate Behaviour च्या अंमलबजावणीचं आवाहन .

ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्श्युरंस मध्ये Irdai ने विविध देशांच्या COVID चाचणी आवश्यकतांबद्दल माहिती पसरवण्यासाठी अशा धोरणांचे अंडरराइटर घेण्यास सांगितले आहे. विमा कंपन्यांनी सर्वात वाईट परिस्थितीसाठी सर्व स्टेकहोल्डर्ससाठी कोविड-संबंधित सहाय्यासाठी एक वॉर रूम तयार करावी, डेटा देखील विशिष्ट फॉर्मेट मध्ये असावा यामुळे कोणतीही विसंगती येणार नाही.

अहवालातील आकडेवारीनुसार, एकूण 26,54,001 आरोग्य विम्याचे क्लेम्स निकाली काढण्यात आले. 31 मार्च 2022 पर्यंत विमा कंपन्यांनी 2.25 लाख मृत्यू क्लेम्सचे निराकरण केले आणि त्यासाठी 17,269 कोटी रुपये दिले.