प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कोरोना व्हायरसबाबतच्या विविध गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. तसेच कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्या आणि घेऊ नये असे सल्ले असणारे मेसेज सुद्धा नागरिकांकडून एकमेकांना पाठवण्यात आले आहेत. याच परिस्थितीत अजून एक म्हणजे वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा सर्वत्र परसली होती. मात्र युएस सेंटर्स फॉर डिझिझ कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंन्शन (WHO) यांच्या नुसार, जिवंत पेशींच्या बाहेरील बहुतेक पृष्ठभागावर कोरोना विषाणू जास्त काळ जिवंत राहत नाही. विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात की, जेव्हा आपण वृत्तपत्राला स्पर्श करता तेव्हा संसर्ग पसरण्याची शक्यता जवळजवळ नसते.

कोझिकोडे येथीस बेबी मेमोरियल हॉस्पिटल मधील डॉक्टर अनुप कुमार यांनी असे म्हटले आहे की, वृत्तपत्र हे कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत धोकादायक असणे ही चुकीची बाब आहे. मात्र जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी वृत्तपत्र वाचत असल्यास कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. याचे कारण वृत्तपत्र नव्हे तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी उभे असणे हे आहे. तसेच एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या नुसार, वृत्तपत्रावर कोरोना व्हायरसचे विषाणू अधिक काळ टिकत नाहीत. त्यामुळे विविध डॉक्टरांनी त्यांच्या मतानुसार, कोरोना हा वृत्तपत्रामुळे परसत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.(Coronavirus: मीटर चालू पण, विजबील छापाई बंद; ग्राहकांनो लाईटबील भरा ऑनलाइन, mahadiscom.in चा करा वापर)

सध्याच्या दिवसात वृत्तपत्रे ही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवली जातात. तसेच वृत्तपत्र छपाईमध्ये मानवी हस्तक्षेप नसतोच असे ही सांगण्यात आले आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि सरकारने दिलेले आदेश पाळल्यास त्याच्या वाढत्या प्रादुर्भावाला कुठेतरी आळा बसेल. तर वृत्तपत्रात अधिकृत माहितीच छापली जाते.