Coronavirus: मीटर चालू पण, विजबील छापाई बंद; ग्राहकांनो लाईटबील भरा ऑनलाइन, mahadiscom.in चा करा वापर
Pay Light Bill Online | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर विजबील छापाईच न करण्याचा निर्णय महावितरण (Mahavitaran) यंत्रणेने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबील ऑनलाईन (Pay Light Bill Online) भरण्यावाचून पर्याय नाही. वीजबील भरना केंद्रावर होत असलेली गर्दी टाळण्यासठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटाचा समाना करण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य, पोलीस, परिवहन विभाग आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. अशात आता राज्याची महावितरण यंत्रणाही सज्ज झाली आहे.

कसे मिळेल विजबील?

  • महावितरण अधिकृत संकेतस्थळ - mahadiscom.in
  • महावितरण संकेतस्थळ, मोबाइल अॅप आदींवरही वीजबिल उपलब्ध.
  • महावितरणकडे उपलब्ध असलेल्या आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश (SMS) येईल.
  • महावितरणकडून आलेल्या संदेशात आपले विजबील किती आहे हे आपल्याला कळेल.
  • महावितरण कन्झुमर पोर्टल, मोबाईल अॅप आदींवर ग्राहकांना मीटर रीडिंग अपलोड करता येऊ शकते.

रिडींग घेतले गेले नसेल तर?

तुमच्या मीटरचे रिडिंग घेण्यासाठी महावितरण कर्मचारी आला नाही. तर, काळजी करु नका. आपले वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. उर्जामंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला सरासरी बील देण्यात येईल. हे बिल आपण ऑनलाईन भरायचे आहे. कोरोना व्हायरस संकट निवारण होत नाही तोवर वीजबिल भरना करण्यासाठी हीच पद्धत वापरली जाईल. तसेच, कोरोना व्हायरस संकट टळून परिस्थिती सामान्य झाल्यावर ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यात येईल. त्यानंतर अचूक बिल ग्राहकांना देण्यात येईल. ( हेही वाचा, Coronavirus च्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना पाठवणार सरासरी बिल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा  )

ग्राहकांनी कोणत्याही कारणास्तवर वीज वितरण कार्यालयात जाणे टाळावे. ग्राहकांना काही तक्रार, माहिती द्यायची असेल तर महावितरणच्या 2477 सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, ग्राहकांनी एक नागरिक म्हणून घरातच बसणे पसंत करावे. अत्यावश्यक गोष्टीशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडूच नये. सर्व कामे ऑनलाईन करण्यावर भर द्यावे, असे अवाहनही महावितरणने केले आहे.