कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रसाराचे संकट महाराष्ट्रावर असताना कमीत कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत, याच पार्श्वभूमीवर,महावितरणच्या (Maharashtra State Electricity Distribution) कर्मचाऱ्यांना देखील घरी राहण्यास सांगितले गेले आहेत, परिणामी येत्या महिन्यासाठीचे वीज बिल देण्यासाठी मीटर रिडींग करायला महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाणार नाहीत आणि पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना सरासरी वीज बिल पाठवण्यात येईल अशी महिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे. यामार्गे ग्राहकांशी होणारा संपर्क कर्मचाऱ्यांना टाळता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे असेही राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; फिलिपाइन्स मधून आलेल्या 68 वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू
नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येईल,तसेच या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. ज्यामुळे नागरिकांना महावितरणच्या वेबसाइटवर बिले उपलब्ध करून देण्यात येतील. ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाई क्रमांकावर बिलाचे अपडेट्स पाठवण्यात येतील. महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 15 रुग्ण; लागण झालेल्यांचा एकूण आकडा 89 वर
दरम्यान, वीजचोरी व बिलासंबंधीच्या तक्रारीवरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये असेही आदेश देण्यात आले आहेत. याकाळात ग्राहकांना दिलासा म्हणजे वीज पुरवठा खंडित किंवा लोडशेडिंग न करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.