महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसच्या (Coronavirus In Maharashtra) संक्रमितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये, याउलट आज सोमवार, 23 मार्च रोजी कोरोनाच्या नव्या 15 रुग्णांची यात भर पडली आहे. या 15 पैकी 14 नवे रुग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळले आहेत तर 1 रुग्ण पुणे (Pune) येथील आहे. यामुळे सद्य घडीला महाराष्ट्रात तब्बल 89 कोरोनाचे रुग्ण आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हे नवे रुग्ण बाधित झाले आहे. कोणतीही लागण ही थेट झालेली नाही त्यामुळे आकडा वाढला असला तरी लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही टोपे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आजपासून लॉक डाऊन चे आदेश देण्यात आले आहेत, यानुसार, कलम 144 जमावबंदी आणि संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी ओसरताना दिसत नाहीये, ही बाब अधिक चिंताजनक आहे त्यामुळे नागरिकांनी सरकारचे आदेश गांभीर्याने पाळावेत अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही टोपे यांनी दिला आहे.
ANI ट्विट
The total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 89: Maharashtra Health Department pic.twitter.com/XeETk5sTXf
— ANI (@ANI) March 23, 2020
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कलम 144 नुसार, महाराष्ट्रात फक्त भाजीपाला, दुध, धान्य, औषधे सेवा, वीज पुरवठा कार्यालये, बँक, आर्थिक व्यवहार होणारी केंद्रे चालू राहणार आहे. तसेच सरकारी कार्यालायत सुद्धा फक्त 5 टक्केच कर्मचारी काम करू शकणार आहेत.