Photo Credit: pixabay

कोविड -19 साथीच्या रोगाने लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जास्त जागरूक केले. लोकांना हे समजले आहे की निरोगी जीवनासाठी उत्तम प्रतिकारशक्ती असणे किती महत्वाचे आहे. हे गुंतागुंत नेटवर्क असे शस्त्र आहे जे आपले शरीर रोग आणि संक्रमणांपासून वाचवते. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच, प्रतिरक्षा प्रणाली देखील दरवर्षी वेळेप्रमाणे कमकुवत होत जाते.ज्याचा सहज अर्थ असा आहे की आपली आजारी पडण्याची शक्यता वाढते.आपल्यात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.अशा वेळी आपली Immune System ला कमजोर होण्यापासून वाचवण्याची गरज असते पण ते कस शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की तुमच्या रोग प्रतिकार शक्तीला कमजोर होण्यापासून वाचवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे.(COVID 19 In India: शाकाहारी, धुम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी याचा थेट संबंध नसल्याचं CSIRचं स्पष्टीकरण )

हे एक मोठ कारण आहे की सध्याच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी जेष्ठ लोकांना जास्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. कारण अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की जे लोक वय वर्ष 60-65 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. असे असणे गरजेचे नाही की तुमच्या वयाप्रमाणेच तुमची इम्यून सिस्टिम कमी असेल. काही वेळा असे ही समोर आले आहे की  ज्यांचे वय 80 आहे मात्र त्यांची इम्यून सिस्टिम 60 वयाच्या व्यक्तीसारखी काम करते. बऱ्याचदा हे उलटे ही असू शकते. (Covid 19 In India: आयुष मंत्रालयाकडून कोविड-19 विषयक आयुर्वेद, युनानी उपचारपद्धतीबाबतची नवी नियमावली जारी )

आपण सगळेच वयाने वाढत असतो. शारीरिक बदल ही प्रत्येकाच्या शरीरात होत असतात. फक्त ते प्रत्येक शरीरानुसार ते वेगवेगळे असू शकतात.बऱ्याचदा हे अनुवांशिक असते पण जास्त प्रमाणात हे जीवनशैलीशी ही प्रभावित होत असते. अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की आपण रक्तातील जीन च्या नमून्यातून अंदाज लावता येऊ शकतो की वय वाढण्याची प्रक्रिया कोणत्या चरणावर आहे. वयाप्रमाणे वाढत्या प्रभावाला कमी केले जाऊ शकते आणि त्यासाठी शारीरिक पद्धतीने सक्रीय राहणे जास्त गरजेचे आहे.अभ्यासानुसार बराच वेळ एकाच मुद्रेमध्ये बसून रहाणे हे शरीरासाठी तेवढेच घातक आहे जेवढे शरीरासाठी सिगरेट पिणे आहे . हे सगळे या वर अवलंबून आहे की टी व्यक्ती किती फिट आहे. पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार व्यायाम करणे, जसे चालने, पायऱ्या चढ़ने-उतरणे हे करणे ही चांगली सुरुवात असू शकते.पण शरीराला एक्टिव ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हेल्दी खाने ही महत्वाचे आहे त्याचबरोबर व्यवस्थित झोप घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे म्हणजेच कमीत कमी 6 ते 7 तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. हे वाढत असलेल्या वयाला कमी करण्याचा एक उपाय आहे.

तेव्हा सध्याच्या वेळेला आपण फिट आणि स्वस्थ राहणे जास्त गरजेचे आहे.त्यासाठी तुम्हाला व्यायाम, चालणे, शरीराची जास्त हालचाल यातील काही ना काही सतत सुरु ठेवणे फायद्याचे आहे.आणि इम्यून सिस्टिम वाढवणे जास्त गरजेचे आहे.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)