Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भलेही मलेरिया (Malaria) आजारावर प्रभावी असेलेले औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) हे 'गेम चेंजर' असल्याचे म्हटले असेल. मात्र, संशोधकांनी केलेला दावा असा की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोना व्हायरस रुग्णांवरील उपचारांसाठी प्रभावी ठरत नाही. मेडआर्काइव्हच्या पी प्रिंट रिपोजिटरीमध्ये वेगळेच निष्कर्ष प्रकाशित करण्या आले आहेत. या निष्कर्षांमध्ये म्हटले आहे की, त्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, ज्यांच्यावर हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर करुन उपचार करण्यात आले आहेत.

संशोधकांनी म्हटले आहे की, 11 एप्रिलपर्यंत अमेरिकेनेही 'वेटरन्स हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन मेडिकल सेंटर' कन्फर्म सार्सकोविड-2 संक्रमन आणि रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या डेटाचा अभ्यास केला. रुग्णांना केवळ हायड्रोक्सीक्लोरोक्विन किंवा अँटीबायोटीक सोबत कोविड 19 रुग्णांना देण्याबात सूचवण्यात आले होते. या डेटाअभ्यासात सुमारे 368 रुग्णांचा अभ्यास करण्यात आले. ज्यात केवळ हायड्रोक्सीक्लोरोक्विन देण्यात आले. या रुग्णांचा मृत्यूदर 27.8% राहिला आहे.

अभ्यासात असेही पुढे आले की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि एजिथ्रोमाइसिन समूहात मृत्यू दर 22.1% इतका राहिला आहे. तर हायड्रोक्सीक्लोरोक्विन न देता उपचार केलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर 11.4% इतका कमी राहिल्याचे दिसले. संशोधकांनी असेही म्हटले आहे की, 'नो एचसी ग्रुप' च्या तुलनेत हायड्रोक्सीक्लोरोक्विन ग्रुपमध्ये आणि एजिथ्रोमाइसिन ग्रुपमध्ये व्हेंटीलेशनचे प्रमाण समान होते. (हेही वाचा, Testicles And Coronavirus: अंडकोषांमुळे पुरुषांमध्ये वाढतो कोरोना व्हायरसचा धोका? मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात COVID-19 रुग्णांवर झाला अभ्यास)

डॉन रिसर्च इंन्सटीट्यूट (कोलंबिया व्हीए हेल्थ केयर सिस्टीम अँड कॉलीग्स) चे जोसेफ मॅगेगनोली यांनी सांगितले की, या अभ्यासात आम्हाला कोणताही पुरावा नाही मिळाला की, केवळ हाइड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा वापर करुन अथवा एजिथ्रोमाइसिन सोबत वापर करुन कोविड 19 रुग्णांची जोखीम कमी होते.