Cancer Early Symptoms: कॅन्सर होण्यापूर्वीची 'ही' 7 महत्वाची लक्षणे, ज्यांना बऱ्याचदा गांभीर्याने घेतले जात नाही
Cancer Symptoms ( Image Credit: Instagram/thisisbabyw)

कर्करोग हा असा आजार आहे जो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. जर योग्य वेळी तो लक्षात आला नाही तर कर्करोगाच्या रुग्णाला वाचविणे जवळजवळ अशक्य होते. असे नाही की कर्करोगाची शरीरात लक्षणे केवळ जास्त झाल्यावरच दिसून येतात. त्याची सुरुवातीची लक्षणे देखील पुरेशी आहेत, जे योग्य वेळी ओळखून आणि चाचणी करून कर्करोग टाळला जाऊ शकतात.डॉक्टर म्हणतात की कर्करोगाची लक्षणे बर्‍याचदा अस्पष्ट असतात, पण तरीही अशी काही लक्षणे आहेत जी कर्करोगाची चिन्ह दर्शवतात. कर्करोगाशी संबंधित बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की या आजाराच्या अगदी सुरुवातीलाच शरीरात लक्षणे दिसून येतात. म्हणजेच, अनेक विलक्षण लक्षणे पाहिली जातात. परंतु बहुतेक लोक या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात आणि त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही. (तुमची 8 तास झोप झाल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो? 'हे' असू शकते कारण) 

जाणून घेऊयात कॅन्सर ची सुरुवातीची काही महत्वाची लक्षणे

  • शरीराच्या कोणत्याही भागात दीर्घकाळापर्यंत वेदना जाणवणे. औषध घेऊनही कोणताच परिणाम न होणे. आजार नसतानाही वेदना जाणवत रहाणे, अस्वस्थता जाणवणे असे होत असल्याच काही चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे.
  • जर आपल्याला बराच काळ खोकला येत असेल तर नक्कीच चाचणी करुन घ्या. श्लेष्मा आणि रक्तासह खोकला ही एक गंभीर स्थिती आहे.
  • जर मूत्राशय किंवा लघवीशी संबंधित समस्या कायम राहिल्यास पुरेशी तपासणी केली पाहिजे. मूत्रात रक्ताची समस्या असल्यास ते गंभीर समस्येचे लक्षण आहे.
  • मोनोपॉज नंतर महिलांना सतत चाचणी करुन घेतली पाहिजे. मोनोपॉज  नंतर रक्तस्त्राव होणे ही  सामान्य गोष्ट नाही. त्याशिवाय हिरड्यांमधून किंवा तोंडातून रक्त येणे हे सुद्धा सामान्य गोष्टीत मोडत नाही. असे होत असल्यास त्वरित चाचणी करुन घ्यावी.
  • कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे ही धोक्याची घंटा आहे .जर तसे घडत असेल तर नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या. असे पाहिले जाते की हे पॅनक्रियाटिक, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसांच्या कर्करोगाचे लक्षण आहे.
  • बराच काळ चांगला आहार घेतल्यानंतर ही सतत थकवा जाणवत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय थकल्यासारखे वाटणे सामान्य नाही.
  • आतड्यांसंबंधी सतत समस्या होणे . अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करुन घ्यावी.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)