Bicycle Day 2020 (Photo Credits: File Image)

आज 19 एप्रिल म्हणजे बाइसिकल डे अर्थात सायकल दिवस. 1943 पासून 19 एप्रिल हा दिवस सायकल दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. सायकल दिवस म्हणजे सायकल वरुन बाहेर फिरायला जाणे असं आपल्या सर्वांना वाटतं. पण हा या सेलिब्रेशनमधील एक भाग झाला. यावरच बायसिकल डे चं सेलिब्रेशन थांबत नाही. पहिल्या लाइसरिक अॅसिड डायथॅलामाइड (Lysergic Acid Diethylamide) याची आठवण देणारा हा दिवस आहे. स्विडीश शास्त्रज्ञ अल्बर्ट हॉफमॅन यांनी Lysergic acid diethylamide (LSD) चे इफेक्ट्स शोधून काढले. तो दिवस म्हणजे 19 एप्रिल 1943. त्या दिवसापासून बायसिकल डे साजरा करण्याची सुरुवात केली.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. सायकल चालवल्यामुळे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य तर लाभतेच. त्याचबरोबर पर्यावरणाचेही नुकसान टाळता येते. कारण सायकलमुळे हवा, ध्वनी प्रदूषण होत नाही. तर बाइसिकल डे 2020 निमित्ताने सायकल संबंधित काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया...

# जगातील सर्वात लांब सायकल ही 20 मीटरपेक्षा जास्त लांबीची असून त्यावर 35 लोक बसू शकतात.

# सायकलस्वारांची संख्या जर 3 पटीने वाढली तर जगातील बाईक चालवण्याचे प्रमाण निम्मे होईल.

# जगातील पहिली सायकल ही फ्रान्समध्ये तयार करण्यात आली होती. पण सायकलला मॉडर्न रुप इंग्लंडमध्ये देण्यात आलं.

# जगातील सर्वात वेगवान सायकलस्वार अमेरिकन असून त्याचे नाव जॉन हॉवर्ट आहे. तासाला 133.75 किमी हा त्याचा सर्वाधिक स्पीड आहे.

# जेवढी ऊर्जा चालण्यासाठी लागते तेवढी ऊर्जा सायकल चालवण्यासाठी वापरली तर आपण तीनपट्ट अधिक अंतर तितक्याच वेळात पार करु शकतो.

# सायकल ही गाडी पेक्षा 20 पट कमी किंमतीची असून तिच्या देखभालीचा खर्चही कमी आहे.

# नेदरलँडमध्ये ज्यांचे वय 15 पेक्षा जास्त आहे. अशा प्रत्येकी 8 पैकी 7 माणसांकडे सायकल आहे.

# सायकलिंगमुळे रक्तप्रवाह तुमचा सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविका होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

# नियमित सायकल चालवल्याने हाता-पायाचे स्नानू मजबूत होतात.

# सायकल चालवल्याने लोव्हर बॉडी मसल्सची स्ट्रेंथ वाढते.

देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने यंदा सायकल दिवसानिमित्त सायकल चालवता येणार नाही. त्यामुळे घरीच राहून सायकल बद्दल नवीन गोष्टी जाणून घ्या.