रोजच्याआहारात अक्रोड खाण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु अक्रोड खाण्याचा योग्य मार्ग माहित असणे आवश्यक आहे. अक्रोडचे सेवन केल्याने मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रण होते. वजन कमी करण्याच्या आहारामध्ये अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर आहे. अक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.अक्रोडचे शरीरातून कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी सेवन करावे. ( Winter Health Tips: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी, तंदुरुस्त आणि सुरक्षित कसे रहाल)

जाणून घेऊयात अजुन कोणकोणते अक्रोड खाण्याचे फायदे आहेत

अक्रोडामुळे ह्रदय विकाराचा धोका कमी होतो.अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात  असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.अक्रोड खाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही ज्यामुळे तुम्हाला ह्रद विकार होण्याचा धोका कमी होतो.

अक्रोड खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुरळीत होते.अक्रोड हे फळ आकाराला मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसते. पण एवढंच नाही दररोज अक्रोड खाण्यामुळे तुमच्या मेंदूचे कार्यदेखील सुरळीत होऊ शकते. अक्रोडामध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.शिवाय निर्णयक्षमता, एकाग्रता आणि पटकन निराश होण्याची सवय यामुळे कमी होते. तुम्हाला त्वरीत उस्ताही वाटू लागतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला निराश आणि उदास वाटतं तेव्हा अक्रोड खाण्याची सवय लावा. (Health Tips: मधुमेह, पित्त, कफ यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी ठरेल तमालपत्र, जाणून घ्या फायदे)

अक्रोड चा उपयोग केसांसाठीही होतो.अक्रोड व अक्रोड च्या तेलाचा उपयोगामुळे केस लांब, दाट आणि काळे होण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा स्वस्थ व कोमल बनते आणि अजून अनेक प्रकारे अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात

अक्रोड कसे खावे

अक्रोडाचे तुकडे फायबर, जीवनसत्त्वे, कर्बोदकांमधे, प्रथिने आणि लोहयुक्त असतात असे म्हणतात.अक्रोड खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते भिजविणे. यासाठी रात्री 2 अक्रोड पाण्यात भिजवा. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी खा. असे केल्याने आपल्याला बरेच आरोग्य फायदे दिसण्यास सुरुवात होईल.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)